Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » मुंबई स्फोटमालिकेत सहभाग नाही

मुंबई स्फोटमालिकेत सहभाग नाही

  • ललित मोदीला एक हजार कोटी दिले होते
  • अल-कायदाशी संबंध
  • गुजराती वृत्तवाहिनीने घेतली दाऊदची मुलाखत

dawood ibrahimनवी दिल्ली, [८ जुलै] – क्रिकेट आणि चित्रपटसृष्टी हे माझे आवडते क्षेत्र आहे. आयपीएल घोटाळेबाज ललित मोदीला आपण एक हजार कोटी रुपये दिले आहेत. मार्च १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेशी माझा संबंध नाही. मात्र, अमेरिकेवर सर्वात शक्तिशाली हल्ला करणार्‍या अल कायदा या जहाल दहशतवादी संघटनेशी आपला संबंध आहे, असे अनेक खुलासे अंडरवर्ल्डचा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमने केले आहेत.
एका गुजराती वृत्तवाहिनीचा पत्रकार पद्मकांत त्रिवेदीला दिलेल्या मुलाखतीत दाऊद बोलत होता. गेल्या २४ वर्षात प्रथमच आपण कुणा पत्रकाराला मुलाखत दिली आहे, असे दाऊद त्याला सांगत होता. ही मुलाखत टेप करण्यात आली असून, यातील आवाज मात्र दाऊदचा नसल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे.
क्रिकेट माझा आवडीचा खेळ असल्याने आणि क्रिकेटवर सट्टा लावणे हा व्यवसाय असल्याने मी आयपीएलचा तत्कालीन आयुक्त ललित मोदीला एक हजार कोटी रुपये दिले होते. माझी ती गुंतवणूकच होती. भारतातही विविध उद्योगांमध्ये मी २४ हजार कोटी रुपये गुंतविले आहेत. मी कुणालाही घाबरत नाही. मला मरणाची भीती नाही. निर्भयपणे आपला व्यवसाय करतो. माझे ज्यांच्याशी संबंध आहेत, ते दहशतवादी आहेत की आणखी कोण, हा माझ्यासाठी महत्त्वाचा मुद्दा नाही. मी केवळ व्यवसायाला महत्त्व देतो, असेही तो म्हणाला.
२४ वर्षांपूर्वी मी इंडिया टुडेला मुलाखत दिली होती. त्यानंतर आता प्रथमच पत्रकाराशी बोलत आहेे. मुंबई स्फोट मालिकेत तुझा हात होता काय, असे विचारले असता, मी निष्पाप लोकांना मारत नाही आणि जो माझ्या व्यवसायाच्या आड येईल, त्याला मी सोडत नाही. माझ्याविषयी कोणी काहीही बोलतात. माझे आरोग्य एकदम चांगले आहे, असेही त्याने सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23325

Posted by on Jul 9 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (1573 of 2453 articles)


=‘अधिनायक’ म्हणजे इंग्रजांची प्रशंसा= जयपूर, [८ जुलै] - भारताच्या राष्ट्रगीतात असलेल्या ‘अधिनायक’ या शब्दाचा अर्थ इंग्रजांची प्रशंसा असा होत असल्याने ...

×