Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » मुंबई हल्ल्याचा लखवीच सूत्रधार

मुंबई हल्ल्याचा लखवीच सूत्रधार

=अमेरिकेने दिले पाकला ठोस पुरावे=
Zakiur-Rehman-Lakhviवॉशिंग्टन, [१७ मार्च] – २६/११ रोजीच्या मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार लष्कर-ए-तोयबाचा सर्वोच्च कमांडर झकिउर रहमान लखवी हाच आहे, हे सिद्ध करणारे ठोस पुरावे भारतापाठोपाठच आता महासत्ता अमेरिकेनेही पाकिस्तान सरकारला दिले आहेत. यामुळे पाक सरकार आता त्याच्याविरुद्ध काय कारवाई करते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
भारताने दिलेले पुरावे लखवीला मुंबई हल्ल्याचा सूत्रधार सिद्ध करण्याइतके सक्षम नाहीत, अशी पळवाट काढून पाकमधील न्यायालयाने त्याच्याविरोधातील खटला कमजोर केला आहे. सोबतच, इस्लामाबाद उच्च न्यायालयाने सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत त्याची अटक बेकायदेशीर ठरवून, त्याला तत्काळ मुक्त करण्याचा आदेशही दिला. तथापि, भारताच्या संतापानंतर पाकमधील पंजाब सरकारने लखवीला पुन्हा अटक करून एक महिन्याकरिता तुरुंगात डांबण्याचे आदेश दिले.
दहशतवादविरोधी लढ्यात आपण प्रामाणिक असल्याचा आव आणणार्‍या पाकमधील हा तमाशा पाहून अखेर अमेरिकेने लखवी हाच मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे सिद्ध करणारे ठोस पुरावे पाकला सादर केले, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
आम्ही पाकला दिलेले पुरावे विश्‍वसनीय आणि सबळ असेच आहेत. मुंबई हल्लाप्रकरणी अमेरिकेत शिक्षा भोगत असलेला तोयबाचा अतिरेकी डेव्हीड हेडलीच्या कबुलीजबाबावर आधारित हे पुरावे आहेत. मुंबई हल्ल्याच्या कटाचा त्याने चौकशीत पर्दाफाश केला आहे. याशिवाय, अमेरिकेतील विविध सुरक्षा आणि गुप्तचर संस्थांनीही या हल्ल्याचा स्वतंत्रपणे तपास केला असून, त्यातही लखवी व तोयबाचे इतर वरिष्ठ नेतेच खरे सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे हा अधिकारी म्हणाला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21531

Posted by on Mar 18 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1898 of 2460 articles)


=भाजपाचा जबरदस्त प्रतिहल्ला= नवी दिल्ली, [१७ मार्च] - कॉंग्रेस पक्ष सध्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. लोकसभेत या पक्षाचे बोटावर मोजण्याइतके ...

×