Home » ठळक बातम्या, बंगाल, राज्य » मुकुल रॉय यांची तृणमूल संसदीय मंडळावरून हकालपट्टी

मुकुल रॉय यांची तृणमूल संसदीय मंडळावरून हकालपट्टी

=जेटलींची स्तुती करणे महागात पडले=
mukul royनवी दिल्ली, [२७ फेब्रुवारी] – केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन त्यांची स्तुती करणे तृणमूल कॉंगे्रसचे वरिष्ठ नेते आणि पक्षाच्या संसदीय मंडळाचे अध्यक्ष मुकुल रॉय यांना चांगलेच महागात पडले. पक्षाध्यक्ष आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज शुक्रवारी मुकुल रॉय यांची पदावरून हकालपट्टी केली आहे.
हजारो कोटींच्या शारदा चिटफंड घोटाळ्यात नाव आल्यानंतर रॉय यांची सीबीआयने चौकशी केली होती. तेव्हापासूनच त्यांचे ममता बॅनर्जी यांच्यासोबतचे संबंध बिघडले होते. त्यांना शह देण्यासाठी बॅनर्जी यांनी अलीकडेच संसदीय मंडळात अतिरिक्त सरचिटणीसाची नियुक्ती केली होती. याच पार्श्‍वभूमीवर रॉय यांनी गुरुवारी अरुण जेटली यांची भेट घेतली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील जेटली यांच्या भाषणाने प्रभावित होऊन रॉय यांनी त्यांची तोंडभरून स्तुती केली होती. इतकेच नव्हे, तर रेल्वे अर्थसंकल्पावर ममतांनी सडकून टीका केल्यानंतर रॉय यांनी अर्थसंकल्पांचीही स्तुती केली. यामुळे ममता त्यांच्यावर अतिशय नाराज झाल्या होत्या.
जेटली यांच्या भेटीवर रॉय यांनी स्पष्टीकरणही दिले होते. ही एक औपचारिक भेट होती. त्यांच्या भाषणाने प्रभावित होऊन मी केवळ त्यांचे कौतुक केले. मी कॉंगे्रस नेते गुलाम नबी आझाद यांचेही त्यांच्या भाषणासाठी अभिनंदन केले होते, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, रॉय यांचे अत्यंत विश्‍वासू म्हणून ओळखले जाणारे शिलाभद्र दत्त यांनाही संसदीय पक्षाच्या सचिवपदावरून हटविण्यात आल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. दरम्यान, मुकुल रॉय उद्या शनिवारी होणार्‍या तृणमूल कॉंग्रेसच्या बैठकीतही उपस्थित राहणार नसल्याचे कळते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20932

Posted by on Feb 28 2015. Filed under ठळक बातम्या, बंगाल, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बंगाल, राज्य (2001 of 2452 articles)


आर्थिक सर्वेक्षण संसदेत सादर मोदी सरकारच्या धडक निर्णयांचा परिणाम नवी दिल्ली, [२७ फेब्रुवारी] - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची ...

×