Home » ठळक बातम्या, वाणिज्य » मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत भारतीय

मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत भारतीय

=१९.६ अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती, दिलीप संघवी मागे पडले=
mukesh-ambani1मुंबई, [२८ एप्रिल] – रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत भारतीय होण्याचा मान प्राप्त केला आहे. त्यांची एकूण संपत्ती १९.६ अब्ज डॉलर्स इतकी आहे. आतापर्यंत अव्वल स्थानी असलेले वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गज उद्योगपती दिलीप संघवी यांनाही मुकेश अंबानी यांनी मागे टाकले आहे.
जगभरातील धनाढ्य व्यक्तींची सातत्याने नोंद घेणार्‍या फोर्ब्जने जगभरातील श्रीमंत व्यक्तींची यादी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. त्यात सर्वाधिक श्रीमंत भारतीयांच्या यादीत मुकेश अंबानी अव्वल स्थानी विराजमान झाल्याचे दिसून आले आहे. तर, १९.३ अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती असलेले दिलीप संघवी दुसर्‍या स्थानावर आहेत. जगातील ५० श्रीमंतांच्या यादीत अंबानी आणि संघवी या दोघांनीच स्थान पटकावले आहे. या यादीत अंबानी ४६ व्या आणि संघवी ४८ व्या क्रमांकावर आहेत.
फोर्ब्जने यापूर्वीच्या आपल्या वार्षिक यादीत जगभरातील श्रीमंतांची नावे प्रसिद्ध केली होती. यात अंबानी ३९ व्या स्थानावर आणि सांघवी ४४ व्या स्थानावर होते. त्यानंतर केवळ दोन दिवसातच संघवी यांनी मुकेश अंबानींना मागे टाकले आणि जगातील सर्वाधिक श्रीमंत असलेल्या भारतीयांच्या यादीत अव्वल स्थानी झेप घेतली होती. पण, आता पुन्हा एकदा मुकेश अंबानी यांनी बाजी मारली आहे.
जगभरातील श्रीमंतांच्या यादीत ८०.३ अब्ज डॉलर्स इतक्या संपत्तीचे मालक असलेले बिल गेट्स पहिल्या स्थानावर आहेत. भारतातील श्रीमंतांच्या यादीत ‘टॉप टेन’मध्ये अंबानी आणि संघवी यांच्या खालोखाल अझिम प्रेमजी, लक्ष्मी मित्तल, शिव नाडर, कुमार मंगलम् बिर्ला, उदय कोटक, सुनील मित्तल, सायरस पुनावाला आणि गौतम अदानी यांचा समावेश आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22367

Posted by on Apr 29 2015. Filed under ठळक बातम्या, वाणिज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, वाणिज्य (1736 of 2455 articles)


६६ लाख लोक प्रभावित सहा जिल्ह्यांमध्ये अजूनही मदतीची प्रतीक्षा बिहार, पश्‍चिम बंगालला पुन्हा धक्के = काठमांडू, [२७ एप्रिल] - ...

×