Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » मुकेश अंबानी सर्वांत श्रीमंत भारतीय

मुकेश अंबानी सर्वांत श्रीमंत भारतीय

  • सलग नवव्या वर्षी कायम राखले अव्वल स्थान
  • -१८.९ अब्ज डॉलर्सची संपत्ती
  • -फ्लिपकार्टच्या संस्थापकांचा देशातील १०० श्रीमंतांमध्ये समावेश

mukesh-ambani1सिंगापूर, [२४ सप्टेंबर] – प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांना सलग नवव्या वर्षी भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती घोषित करण्यात आले असून, फ्लिपकार्टच्या संस्थापकांचा प्रथमच अव्वल १०० भारतीय श्रीमंतांमध्ये समावेश झाला आहे.
मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत ४.७ अब्ज अमेरिकन डॉलर्सची घट झाली असली तरी १८.९ अब्ज डॉलर्ससह ते सर्वांत श्रीमंत भारतीय ठरले आहेत. फोर्ब्ज या प्रख्यात नियतकालिकाने घोषित केलेल्या श्रीमंत भारतीयांच्या यादीत मुकेश अंबानी यांच्यानंतर सन फार्माचे दिलीप सांघवी १८ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसर्‍या स्थानावर आहेत. विप्रोचे अझीम प्रेमजी यांनी १५.९ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह आपले तिसरे स्थान कायम ठेवले आहे. फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन व बिन्नी बन्सल यांनी प्रत्येकी १.३ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ८६ वे स्थान पटकावले असून, प्रथमच अव्वल १०० भारतीय श्रीमंतांमध्ये प्रवेश केला आहे.
चालू आर्थिक वर्षात भारताचा सात टक्के दराने आर्थिक विकास होईल, असा अंदाज फोर्ब्जने व्यक्त केला आहे. परंतु, शेअर बाजारातील घसरण आणि रुपयाचे अवमूल्यन यामुळे गेल्या वर्षभरात १०० श्रीमंत भारतीयांच्या संपत्तीत बरीच घसरण झाली आहे. किमान १० श्रीमंतांच्या संपत्तीमध्ये एका वर्षात एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त घट झाली आहे. यामध्ये स्टील सम्राट लक्ष्मी मित्तल यांचाही समावेश आहे. या १०० जणांच्या यादीत फ्लिपकार्टच्या संस्थापकांसह १२ नवे चेहरे आहेत. त्यामध्ये इंडिगोचे सहसंस्थापक राकेश गंगवाल यांचाही समावेश आहे. १.६ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ते ७० व्या स्थानावर आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24052

Posted by on Sep 25 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1414 of 2458 articles)


=पेट्रोलियम मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची बैठक= नवी दिल्ली, [२४ सप्टेंबर] - पेट्रोलियम कंपन्यांचे जाळे देशभर पसरविण्याची सरकारची योजना असून, याचाच ...

×