Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » मुख्यमंत्री फडणवीस यांची दिग्विजयसिहांना नोटीस

मुख्यमंत्री फडणवीस यांची दिग्विजयसिहांना नोटीस

FADNAVIS_DEVENDRAमुंबई, [२० मार्च] – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता ऍक्सिस बँकेत उपाध्यक्ष असल्याने मुख्यमंत्र्यांनी एसआरएच्या विकासकांना ऍक्सिस बँकेत खाते उघडण्यास सांगितल्याचा आरोप कॉंग्रेसचे वादग्रस्त सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी ट्विटरवरुन केला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या ट्विट्सविरोधात दिग्विजय सिंहांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे.
दिग्विजय सिंह यांनी १८ मार्च रोजी केलेल्या वादग्रस्त ट्विटविरोधात ही नोटीस पाठवण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता यांच्याबाबत ट्वीट करून दिग्विजय यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर वशिलेबाजीचा आरोप केला होता.
नोटीस मिळाल्यानंतर १५ दिवसांच्या आत माफी मागा किंवा ट्विट्स परत घ्या, अथवा अब्रुनुकसानीच्या खटल्याला तयार राहा, असे मुख्यमंत्र्यांनी या नोटीसमध्ये म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27487

Posted by on Mar 21 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (602 of 2451 articles)


=पंतप्रधानांचा शेतकर्‍यांना मंत्र, डेअरी, पोल्ट्रीवर भर देण्याचाही सल्ला= नवी दिल्ली, [१९ मार्च] - सलग दोन वर्षे मान्सूनचा कमी पाऊस आणि ...

×