मुख्यमंत्र्यांनी शब्द खरा केला
Saturday, January 10th, 2015- भ्रष्ट बाबूंना दिला दणका
- विदर्भातील तिघांसह आठ अधिकार्यांची संपत्ती गोठविणार
मुंबई, [९ जानेवारी] – राज्य प्रशासनातील भ्रष्ट अधिकार्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ठोस पुराव्यांसह पाठविलेली कोणतीही फाईल दडविली जाणार नाही आणि अशा अधिकार्यांना पाठीशी घातले जाणार नाही, हा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरा करून दाखविला आहे. राज्यातील अशा आठ भ्रष्ट अधिकार्यांविरुद्ध कारवाई करताना मुख्यमंत्र्यांनी त्यांची संपत्ती गोठविण्याचा आदेश दिला आहे. यात विदर्भातील तिघांचा समावेश आहे.
मुख्यमंत्र्यांनी भ्रष्ट बाबूंना कायमचा लक्षात राहील, असाच धडा शिकविण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. बड्या सरकारी बाबूंवर भ्रष्टाचाराचे आरोप असतानाही, त्यांची मालमत्ता जप्त करण्याच्या आदेशाची लाललुचपत प्रतिबंधक विभागाला प्रतीक्षा होती, अशा अधिकार्यांच्या मालमत्ता जप्तीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखविला. कुठल्याही राजकीय परिणामांची तमा न बाळगता आणि दिलेला शब्द खरा करून दाखविणार्या मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे भ्रष्टाचारी अधिकार्यांची मालमत्ता आता जप्त होणार आहे. मुख्यमंत्र्यांचा हा आदेश सरकारी बाबूंवर संक्रांत आणणाराच आहे.
गुरुवारी त्यांनी अशा आठ भ्रष्ट अधिकार्यांची संपत्ती जप्त करण्याचा आदेश दिला आहे. तथापि, भ्रष्टाचाराचे आरोप असणार्या अधिकार्यांची आणखी मोठी यादी बाहेर येऊ शकते. त्यामुळे या अधिकार्यांबाबतही मुख्यमंत्री अशीच कठोर भूमिका घेतील, अशी शक्यता सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.
संपत्ती जप्त करण्यात येणार्या अधिकार्यांची यादी
१) नितीश ठाकूर, उप-जिल्हाधिकारी, रायगड
संपत्ती -१४ लाख ३३८ रुपये
२) भाऊसाहेब आंधळकर, पोलिस निरीक्षक, पुणे ग्रामीण
संपत्ती – ९८ लाख रुपये
३) पंढरी कावळे, मुख्याध्यापक, गडचिरोली
संपत्ती – ७१ लाख रुपये
४) विनोद निखाते, कारकून, चंद्रपूर
संपत्ती – १२ लाख रुपये
५) दादाजी खैरनार, उप अभियंता, सा. बां. विभाग, दिंडोरी
संपत्ती – २३ लाख रुपये
६) अशोक मान, वरिष्ठ सहाय्यक, ससून रुग्णालय, पुणे
संपत्ती – २१ लाख रुपये
७) विजयकुमार बिराजदार, प्रभाग अभियंता, जलसंपदा विभाग, लातूर
संपत्ती – ३८ लाख रुपये
८) नितीश पोद्दार, कंपाऊंडर, प्राथमिक आरोग्य केंद्र, गडचिरोली
संपत्ती ६ लाख रुपये
Short URL: https://vrittabharati.in/?p=19529

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!