Home » क्रीडा, ठळक बातम्या » मुदगल समितीची श्रीनिवासन यांना ‘क्लीन चिट’

मुदगल समितीची श्रीनिवासन यांना ‘क्लीन चिट’

N-Srinivasanनवी दिल्ली, [१७ नोव्हेंबर] – इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएलच्या सहाव्या सत्रात स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणाची चौकशी करणार्‍या न्या. मुदगल समितीने आयसीसीचे प्रमुख एन. श्रीनिवासन यांना क्लीन चिट दिली असून, त्यांचे जावई गुरूनाथ मयप्पन यांनाही किंचित दिलासा दिला आहे. तथापि, राजस्थान रॉयल्सचे मालक राज कुंद्रा आणि आयपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर रमन हे सामन्यांवर सट्टा लावत असल्याचे अहवालात नमूद असल्याने या दोघांच्याही अडचणी वाढल्या आहेत.
गेल्या आठवड्यात न्या. मुदगल समितीने दोषी ठरविलेल्या अहवालातील काही नावे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केली होती. तथापि, आज मात्र आपल्या अहवालात श्रीनिवासन आणि मयप्पन यांना क्लीन चिट देण्यात आली असल्याची माहिती समितीने दिली.
मुदगल समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, स्पॉट फिक्सिंग किंवा सट्टेबाजीत श्रीनिवासन यांचा सहभाग नव्हता. यासंदर्भात सुरू असलेल्या चौकशीला श्रीनिवासन प्रभावित करू शकत नाहीत. राजस्थान रॉयल्सचे राज कुंद्रा मात्र सट्टेबाजांच्या सातत्याने संपर्कात होते. सामन्यांवर ते सट्टा लावत होते. आयपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर रमन हेदेखील एका सट्टेबाजाच्या संपर्कात होते. एकदा सामना सुरू असताना त्यांनी तब्बल आठवेळा एका सट्टेबाजाशी संपर्क साधला होता. मयप्पन यांचाही सट्टेबाजांसोबत संपर्क होता. मात्र, ते स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभागी नव्हते. बीसीसीआयच्या अधिकार्‍यांना याची माहिती होती. पण, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते, असेही अहवालात म्हटले आहे. दरम्यान, या अहवालामुळे बीसीसीआयची निवडणूक लढविण्याचा श्रीनिवासन यांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=18328

Posted by on Nov 18 2014. Filed under क्रीडा, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, ठळक बातम्या (2342 of 2455 articles)


मादक द्रव्यांच्या नव्हे कुटुंबाच्या प्रेमात पडा : सचिनचे आवाहन २.७९ कोटींच्या योजनांचा शुभारंभ नेल्लोर, [१६ नोव्हेंबर] - आजची तरुणाई ...

×