Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » मुलींच्या बँक खात्यावर ९.१० टक्के करमुक्त व्याज

मुलींच्या बँक खात्यावर ९.१० टक्के करमुक्त व्याज

=केंद्र सरकारची योजना=
Beti-Bachao-Beti-Padhaoनवी दिल्ली, [२७ जानेवारी] – स्त्रीभृण हत्यांच्या वाढत्या घटना रोखण्यासाठीआणि महिलांना समाजात सक्षम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ तसेच ‘सुकन्या समृद्धी योजना’ अशा दोन महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आहेत. यातील सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत दहा वर्षांपर्यंतच्या मुलीचे बँक खाते उघडल्यास त्या खात्यातील जमा रकमेवर ९.१० टक्के इतके करमुक्त व्याज मिळणार आहे. या योजनेत विदर्भातील वाशिम आणि बुलढाण्याचा समावेश आहे.
गर्भातच मुलींची हत्या करण्याच्या प्रथेला आळा घालण्यासाठी या दोन्ही योजना महत्त्वाच्या सिद्ध होणार आहेत. देशातील मुलींना चांगले शिक्षण देण्याठीही या योजनांचा मोठा लाभ होणार आहे.
स्त्रीभृण हत्या करणारे लोक मनोरुग्ण असतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ठाम मत आहे. लिंगभेद हा समाजाला जडलेला गंभीर आजार आहे. यामुळेच देशात महिलांचा जन्मदर घटत आहे, असेही पंतप्रधानांनी या दोन्ही योजना सुरू करताना म्हटले आहे.
मुलगी जन्माला आल्यास तिला मारले जाते. तिथेच दुसरीकडे लोक आपल्या मुलाच्या लग्नाकरिता उच्चशिक्षित मुलीचाही शोध घेत असतात. ही मानसिकता योग्य नाही. आपल्या समाजात आजही मुलगा-मुलगी यांच्यात भेद होत असेल, तर स्वत:ला एकविसाव्या शतकातील नागरिक म्हणण्याचा आपल्याला अधिकारच नाही. आपण अजूनही १८ व्या शतकातच जगतो, असेच म्हणावे लागेल, असे पंतप्रधान मोदी यांनी हरयाणात या योजनांच्या उद्‌घाटनाप्रसंगी आयोजित समारंभात स्पष्ट केले.
अशी आहे सुकन्या समृद्धी योजना
मुलींचे उच्चशिक्षण, लग्न अशा मोठ्या खर्चांसाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. मुलींचा जन्म झाल्यानंतर तिच्या नावाने बँकेत खाते उघडावे लागणार आहे. दहा वर्षांपर्यंतच्या मुलींसाठी ही योजना आहे. एक हजार रुपये खात्यात जमा करणे या योजनेंतर्गत आवश्यक आहे. जास्तीतजास्त दीड लाख रुपये जमा करण्याची परवानगी राहणार आहे. या खात्यातील ठेवीवर ९.१० टक्के इतके करमुक्त व्याज मिळणार आहे. मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर या खात्यातील ५० टक्के रक्कम काढता येऊ शकते. वयाच्या २१ व्या वर्षापर्यंत हे खाते सुरू ठेवता येईल.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20097

Posted by on Jan 28 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2165 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२७ जानेवारी] - प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजपथवरील मुख्य समारंभातील उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांचा एक फोटो दोन दिवस सोशल ...

×