Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » मुस्लिम कोट्यासाठी पाकमध्ये मागणी करा

मुस्लिम कोट्यासाठी पाकमध्ये मागणी करा

=शिवसेनेने ओवेसीला सुनावले=
saamna sampadakiyaमुंबई, [३ मार्च] – महाराष्ट्रात मुस्लिमांना आरक्षण देण्यात यावे, या एमआयएमचे प्रमुख असदुद्दिन ओवेसीच्या मागणीवर शिवसेनेने जोरदार टीका केली आहे. जर त्यांना धार्मिक आधारावर आरक्षण हवे असेल, तर पाकिस्तानला जावे आणि आरक्षणाची मागणी करावी, अशा शब्दात शिवसेनेने सुनावले आहे.
शनिवारी नागपूर येथील जाहीर सभेला संबोधित करताना ओवेसीने ही मागणी केली होती. ओवेसीचे वक्तव्य द्वेषभावनेने प्रेरित आहे आणि यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने त्यांच्यावर खटला दाखल करावा, अशी मागणी देखील शिवसेनेने केली आहे. मराठा आरक्षणाच्या धरतीवर मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या ओवेसीच्या मागणीवर तिखट प्रतिक्रिया नोंदवत अशा मागण्यांमुळेच पाकिस्तान आणि भारताचे विभाजन झाल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या दैनिकातून पक्षाने ओवेसीला कडक शब्दात सुनावले आहे. अल्पसंख्यक समुदायाने भारताला आपली मातृभूमी मानावयास हवे. समान नागरी कायद्याचा त्यांनी मान राखला पाहिजे, काश्मीरचे ३७० कलम कायम ठेवण्याची मागणी मागे घ्यायला हवी, असे मतही यात व्यक्त करण्यात आले. मुस्लिम नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, या त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना मुस्लिम दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे हिंदूचा किती छळ झाला, याचे उत्तर ते देतील का? असा रोखठोक प्रश्‍न शिवसेनेने विचारला आहे. त्यांच्या द्वेषपूर्ण भाषणाने देशात जातीय तेढ निर्माण होत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
अफजल राष्ट्रद्रोही होता : संजय राऊत
अफजल गुरूवर अन्याय झाला, या मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना अफजलला राष्ट्रदोहाच्या आरोपावरून फाशी देण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. अफजलला सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. मणिशंकर अय्यर यांना जर अफजलवर अन्याय झाला असे वाटत असेल तर त्यांनी हे वक्तव्य पाकिस्तानात जाऊन करावे, भारतात नव्हे, असेही सामनाकारांनी रोखठोकपणे बजावले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21080

Posted by on Mar 4 2015. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (1983 of 2452 articles)


=मणिशंकर अय्यर यांचीही मुक्ताफळे= नवी दिल्ली, [३ मार्च] - पीडीपीच्या काही आमदारांनी संसद हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार अफजल गुरूच्या अवशेषाची वादग्रस्त ...

×