Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » मुस्लिम लोकसंख्येत २४ टक्के वाढ

मुस्लिम लोकसंख्येत २४ टक्के वाढ

  • सर्वात जास्त मुस्लिम जम्मू-काश्मिरात
  • एकूण लोकसंख्येतील वाटा १३.४ वरून १४.२ टक्क्यांवर

muslim populationनवी दिल्ली, [२२ जानेवारी] – २००१ ते २०११ या दशकभरात देशाच्या लोकसंख्या वाढीचे सरासरी प्रमाण १८ टक्के असून, मुस्लिम लोकसंख्येत २४ टक्के वाढ होऊन एकूण लोकसंख्येतील मुस्लिमांचे प्रमाण १३.४ टक्क्यांवरून १४.२ टक्क्यांवर गेले आहे.
संपूर्ण देशभराचा विचार करायचा झाल्यास जम्मू-काश्मिरात मुस्लिमांची संख्या सर्वात जास्त म्हणजे ६८.३ टक्के आहे. त्याखालोखाल आसाम (३४.२ टक्के) आणि पश्‍चिम बंगाल (२७ टक्के) या राज्यांचा क्रमांक लागतो, असे धार्मिक आधारावर करण्यात आलेल्या जनगणनेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे. १९९१ ते २००१ या कालावधीत मुस्लिम लोकसंख्या वाढीचे प्रमाण २९ टक्के होते. त्या तुलनेत २००१ ते २०११ या कालावधीत मुस्लिम लोकसंख्या वाढीचे प्रमाण २४ टक्क्यांपर्यंत खाली आले असले तरी राष्ट्रीय सरासरी १८ टक्क्यांपेक्षा हे प्रमाण जास्तच आहे.
मुस्लिम लोकसंख्या वाढीचे सर्वात जास्त प्रमाण आसामात असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. २००१ साली आसामच्या एकूण लोकसंख्येपैकी मुस्लिमांची टक्केवारी ३०.९ टक्के इतकी होती. त्यानंतरच्या दशकात हे प्रमाण ३४.२ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. गेल्या तीन दशकांपासून बांगलादेेशी घुसखोरांच्या समस्येमुळे आसाम त्रस्त आहे, हे याठिकाणी उल्लेखनीय. रजिस्ट्रार जनरल ऑफ सेन्सस अजूनही यासंबंधीची आकडेवारी गोळा करत आहेत आणि अधिकृतपणे लवकरच ती घोषित केली जाईल, असे गृह मंत्रालयातील एका अधिकार्‍याने याबाबत बोलताना सांगितले.
या दशकात मुस्लिमांची लोकसंख्या कमी होणारे मणिपूर हे एकमेव राज्य आहे. या राज्यात मुस्लिम लोकसंख्येचे प्रमाण ८.८ वरून ८.४ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. बांगलादेशी घुसखोर हा मुद्दा असलेल्या पश्‍चिम बंगाल या आणखी एका राज्यात २००१ साली २५.२ टक्के असलेली मुस्लिमांची संख्या २०११ मध्ये २७ टक्क्यांवर गेली आहे. ही संख्या १.८ पर्सेंटेज पॉईंट्‌स असून, ०.८ टक्के या राष्ट्रीय सरासरीपेक्षा दुप्पट आहे. उत्तराखंडमधील मुस्लिम लोकसंख्येचे प्रमाण ११.९ वरून वाढून १३.९ टक्के झाले आहे. २००१ ते २०११ या कालावधीत लोकसंख्या वाढीचा हा दर २ पसेर्र्टेज पॉईट्‌सने जास्त आहे. २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार एकूण मुस्लिम लोकसंख्या वाढीचे जास्त प्रमाण असलेल्यांमध्ये केरळ (२४.७ वरून २६.६ टक्के), गोवा (६.८ वरून ८.४ टक्के), जम्मू-काश्मीर (६७ वरून ६८.३ टक्के), हरयाणा (५.८ वरून ७ टक्के) आणि दिल्ली (११.७ वरून १२.९ टक्के) यांचा समावेश आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19893

Posted by on Jan 23 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2192 of 2453 articles)


=मोदी इफेक्ट..., संयुक्त अरब अमिरात पहिल्या स्थानावर= डाव्होस, [२१ जानेवारी] - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भारताची सत्ता येताच जागतिक पातळीवर ...

×