Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » मृत्यूशी झुंज संपली हनुमंतप्पाचे निधन

मृत्यूशी झुंज संपली हनुमंतप्पाचे निधन

hanumanthappa11नवी दिल्ली, [११ फेब्रुवारी] –
दब गया जिस्म हिम तले
पर बची रही जान
ए हिंद के वीर तुझपे
सौ सौ जानें कुर्बान
कराडो हाथोंने मांगी
तेरे लिए दुआ
पर मौत जीत गई
जिंदगी का जुआ
देशाचा वीर सुपुत्र लान्सनायक हनुमंतप्पा कोप्पद यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज आज अखेर सकाळी अपयशी ठरली. काळाने या देशाच्या साहसी हिमवीरावर अखेर झडप घातली. स्थानिक लष्करी रुग्णालयात गुरुवार, ११ रोजी गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी या शूरवीर जवानाची प्राणज्योत मालवली. सियाचीनमध्ये हिमस्खलन होऊन त्याखाली नऊ भारतीय जवानांसह गाडल्या गेल्यापासून ते गुरुवारपर्यंत त्याचा मृत्यूशी लढा सुरू होता.
सकाळी जाहीर करण्यात आलेल्या वैद्यकीय पत्रकात, जीवन प्रणालीवर ठेवलेल्या हनुमंतप्पाची प्रकृती अतिशय नाजूक असल्याचे आणि कोणत्याही औषधांचा परिणाम त्यांच्यावर होत नसल्याचे डॉक्टरांनी नमूद केले होते. त्याच्या काही अवयवांनीही काम करणे बंद केले होते.
सियाचीनमध्ये सतत सहा दिवस बर्फाखाली दबलेल्या हनुमंतप्पाची प्रकृती पहिलेपासूनच चिंताजनक होती. त्याच्या किडनी, लिव्हर हे अवयव काम करीत नसल्याचे डॉक्टरांनी आधीच जाहीर केले होते. याशिवाय त्याच्या मेंदूला प्राणवायूचा कमी पुरवठा होत होता आणि त्याच्या फुफ्फुसांनाही निमोनियाने वेढले होते. त्याच्यावर डॉक्टर प्रयत्नांची शर्थ करीत असतानाच गुरुवारी अखेर तो क्षण आला आणि डॉक्टरांनी हनुमंतप्पाला वीरमरण आल्याचे जाहीर कर्नाटकातील धारवाड येथील त्यांच्या कुटुंबीयांसह संपूर्ण देश दु:खसागरात बुडाला. गुरुवारी पावणेबाराच्या सुमारास हृदयक्रिया बंद पडून या वीरजवानाचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी व लष्कराच्या प्रवक्त्याने अधिकृतरीत्या जाहीर केले.
हनुमंतप्पाच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून शालेय विद्यार्थ्यांपासून ते मान्यवरांपर्यंत सर्वच स्तरातील लोकांनी प्रार्थना केली. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी लष्कर प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यासह रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून बरे होण्याबाबत प्रार्थना केली. एवढेच नव्हे तर उत्तर प्रदेशातील लखीमपूर जिल्ह्यातील सरिता पांडे हिच्यासह सीआयएसएफमधील सेवानिवृत्त हेडकॉन्स्टेबल प्रेमस्वरूप यांनीही आपली किडनी दान देण्याची तयारी दाखवली होती. मात्र, नियतीपुढे दवा व दुआ कामी आले नाहीत.
लष्करासह नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली
लष्करी इस्पितळातून हनुमंतप्पा यांचे पार्थिव नंतर दिल्ली कॅटॉन्मेंटमधील बेरार चौकात अन्त्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी लष्करप्रमुख जनरल सुहाग यांच्यासह संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक अधिकारी व नेत्यांनी हनुमंतप्पा यांना पुष्पांजली वाहिली
व्यंकय्या नायडू : हनुमंतप्पा यांच्या निधनावर केंद्रीय नागरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी शोक व्यक्त केला आहे. ट्विटरवर ते म्हणतात की, या जवानाच्या निधनामुळे मी खूप दु:खी आहे. सियाचीनसारख्या कठीण हवामान असलेल्या प्रदेशात ते बर्फाखाली सहा दिवस मृत्यूशी झुंज देत होते. यावरूनच तो ते एक निधड्या छातीचा सैनिक होतो, हे दिसून येते.
जनरल दलबीरसिंह सुहाग : हनुमंतप्पा यांच्यातला सैनिक येणार्‍या पिढ्यांना प्रेरणा देत राहणार आहे, असे लष्कर प्रमुख जनरल दलबीरसिंह सुहाग यांनी आपला शोक व्यक्त करताना म्हटले आहे.
पंतप्रधानांना दु:ख
हनुमंतप्पाच्या वीरमरणाचे वृत्त ऐकून अतीव दु:ख झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. फेसबुकवर ते लिहितात की, ‘आम्हाला दु:खसागरात लोटून आपण निघून गेलात. तुमच्यातला सैनिक सदैव जिवंत राहील. आम्हाला गर्व आहे की, तुमच्यासारख्या देशभक्ताने भारतमातेची सेवा केली.’

Short URL: https://vrittabharati.in/?p=26817

Posted by on Feb 12 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (834 of 2453 articles)


=संयुक्त अरब अमिरातीची भारताला ‘ऑफर’= नवी दिल्ली, [११ फेब्रुवारी] - भारताने आपल्या कच्च्या तेलाच्या साठ्यासह आमचे तेलही साठवून ठेवावे त्याबदल्यात ...

×