‘मेक इन महाराष्ट्र’साठी मुख्यमंत्र्यांचा चीन दौरा
Thursday, May 14th, 2015मुंबई, [१३ मे] – राज्यातील ‘मेक इन महाराष्ट्र’ अभियानाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच दिवसांचा चीनचा दौरा करणार आहेत. या दौर्यासाठी ते गुरुवार, १४ रोजी रवाना होणार आहेत.
या दौर्याचे वैशिष्ट्य म्हणजे देवेंद्र फडणवीस हे अन्य दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत सहभागी होत आहेत. बीजिंग येथे शुक्रवार, १५ ला ते नरेंद्र मोदी यांच्यासमवेत स्टेट/प्रोव्हिन्शियल लिडर्स फोरममध्ये सहभागी होतील. याच फोरममध्ये होणार्या भारत-चीन विकासविषयक भागीदारी संबंध दृढ करण्याविषयी राज्यांची भूमिका आणि सस्टेनेबल अर्बनायझेशन : स्मार्ट सिटी, स्मार्ट लिव्हिंग या चर्चासत्रांमध्येही मुख्यमंत्री सहभागी होतील. यादरम्यान महत्त्वाचे करारही करण्यात येणार आहे.
शनिवारी मुख्यमंत्री याप, तैयुआन हेवी इंडस्ट्री, सीजीजीसी, ग्रेट वॉल मोटार्स, सॅनी या उद्योगसमुहांसोबत बैठका घेतील. याचदिवशी डुंगहॉंग येथे औरंगाबाद आणि डुंगहॉंग (गानसू) या शहरांमध्ये सिस्टर सिटी करार होणार असून त्यासाठी परस्पर सहकार्याबाबत चर्चा देखील होणार आहे. दरम्यान रविवारी ते किंगडाओच्या महापौरांची सदिच्छा भेट घेतील.
गुरुवारी झेंगझाऊ भेटीवेळी मुख्यमंत्री फॉक्सकॉन उद्योगाच्या उत्पादन केंद्राला भेट देणार असून त्यानंतर फॉक्सकॉनचे अध्यक्ष टेरी गौ आणि त्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करतील. बीजिंग येथील फोरममधील सहभागानंतर मुख्यमंत्री फडणवीस बैकी फोटॉनचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी जिनयू वांग यांची भेट घेतील.
या दौर्यात मुख्यमंत्री झेंगझाऊ, बीजिंग, डुंगहॉंग, चिंगडाओ येथील विविध औद्योगिक बैठकांमध्ये सहभागी होतील. यादरम्यान अधिकाधिक उद्योग, कंपन्यांची महाराष्ट्रात गुंतवणूक होऊन ‘मेक इन महाराष्ट्र’ अभियान यशस्वी करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री प्रयत्नशील असणार आहेत. सोमवारी हेअर उद्योग समूहाबरोबर चर्चा करतील. त्यानंतर महाराष्ट्रातील गुंतवणुकीबाबत आयोजित चर्चासत्रात मुख्यमंत्री सहभागी होतील. या दौर्यात मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, नगर विकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर आदी सहभागी होणार आहेत.
Short URL: https://vrittabharati.in/?p=22533

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!