Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » मेडल्स परत करणे राष्ट्राचा अपमान

मेडल्स परत करणे राष्ट्राचा अपमान

  • आंदोलन राजकीय नाही, हे सिद्ध करा
  • मनोहर पर्रीकर यांची कणखर भूमिका

parrikar_manohar3अरक्कोनम्, [१३ नोव्हेंबर] – माजी सैनिकांनी मेडल्स परत करणे हा देशाचा आणि देशाचे रक्षण करण्यासाठी प्राणाहुती देणार्‍या सशस्त्र दलांचा अपमान आहे, अशी कणखर भूमिका घेताना ‘वन रँक वन पेन्शन’ मागणीसाठी मेडल्स परत करण्याचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित नाही, हे माजी सैनिकांनी सिद्ध करावे, असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज शुक्रवारी येथे स्पष्ट केले.
‘या घडामोडीवर मी जर काही भाष्य केले, तर तो आरोप ठरेल. त्यामुळे मेडल्स परत करण्याचे आंदोलन राजकीय नाही, हे आता माजी सैनिकांनीच सिद्ध करावे,’ असे पर्रीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सरकारने माजी सैनिकांची ४२ वर्षे जुनी मागणी मान्य करून ‘वन रँक वन पेन्शन’साठी अधिसूचना जारी केली असतानाही, काही माजी सैनिकांनी आता मेडल्स परत करण्याचे धोरण स्वीकारले आहे. यामागे भाजपाच्या विरोधकांचा हात असावा, असे तुम्हाला वाटते का, असा प्रश्‍न त्यांना विचारण्यात आला होता.
सशस्त्र दलांतील जवान जेव्हा देशासाठी लढतात, प्राणाहुती देतात, तेव्हा त्यांना देण्यात येणारे मेडल्स देशाची शान असतात, जवानांच्या शौर्याचे प्रतीक आहे. जवानांची सेवा आणि शर्तींशी मेडल्सचा काहीच संबंध नसतो. तिथेच, पेन्शनचा मुद्दा हा सेवा व शर्तींशी संबंधित आहे. त्यामुळे मेडल्स परत करणे हा देशाचा अपमान आहे. देशाची सेवा प्रत्येकच जवान करतो, पण त्या सर्वांनाच मेडल्स मिळत नाहीत, असेही पर्रीकर यांनी स्पष्ट केले.
गेल्या ४२ वर्षांपासून प्रलंबित असलेली ‘वन रँक वन पेन्शन’ योजना लागू करण्याचे वचन भाजपाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते आणि अवघ्या वर्षभरात ते पूर्ण केले. यानंतरही जर माजी सैनिकांच्या काही तक्रारी असतील, तर त्या दूर करण्यासाठी सरकारने न्यायालयीन आयोग गठित केला आहे. या सैनिकांनी आयोगापुढे आपली बाजू सादर करावी, असेही त्यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25426

Posted by on Nov 14 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1247 of 2453 articles)


मुंबई, [१३ नोव्हेंबर] - राज्यासह देशभरात दिवाळीची धामधूम सुरू असतानाच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचा आरोप असलेले राष्ट्रवादी ...

×