Home » ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य » मेहबुबा होणार पहिल्या महिला मुख्यमंत्री

मेहबुबा होणार पहिल्या महिला मुख्यमंत्री

=भाजपा विधिमंडळ पक्षनेतेपदी निर्मलसिंह,मंगळवारी शपथविधी?=
mehbooba-muftiश्रीनगर/जम्मू, [२५ मार्च] – जम्मू-काश्मिरात पुन्हा पीडीपी-भाजपा आघाडीचे सरकार स्थापन होणार हे आता स्पष्ट झाले असून, गुरुवारी पीडीपी विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा बहुमान मेहबुबा मुफ्ती यांना मिळणार आहे.
भाजपा विधिमंडळ पक्षाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत डॉ. निर्मलसिंह यांची पक्षनेतेपदी एकमताने निवड झाली आणि राज्य शासनात उपमुख्यमंत्री म्हणूत ते भाजपाचे नेतृत्व करतील, असे प्रदेश भाजपाध्यक्ष सतपाल शर्मा यांनी याबाबत माहिती देताना सांगितले. भाजपाचे प्रभारी सरचिटणीस राम माधव आणि केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्रसिंह विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित होते.
काही मुद्यांबाबत पीडीपीसोबत चर्चा व्हायची असल्याने आम्ही आज राज्यपालांना भेटणार नाही. ही चर्चा पूर्ण झाल्यानंतर दोन्ही पक्षांचे नेते एकत्रित राज्यपालांना भेटतील, असेही शर्मा यांनी स्पष्ट केले. राज्यात भाजपा-पीडीपीचे सरकार स्थापन करण्याबाबत कोणतेही मतभेद नसून, जुन्या आराखड्याप्रमाणेच नवे सरकार स्थापन होईल, असे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्रसिंह यांनी सांगितले.
मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर पीडीपी-भाजपा सरकार स्थापन करण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी दोन दिवसांपूर्वी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतरच सरकार स्थापनेचा तिढा संपल्याचे स्पष्ट झाले होते.
मेहबुबा यांची निवड
यानंतर गुरुवारी श्रीनगर येथे झालेल्या पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मेहबुबा मुफ्ती यांची नेतेपदी निवड करण्यात आली. विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आल्यानंतर मेहबुबा यांनी पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले. माझ्या नेतृत्वावर तुम्ही जो विश्‍वास दाखवला आहे त्याला कधीही तडा जाऊ देणार नाही. वडिलांचे मिशन आणि पीडीपीच्या अजेंड्यानुसार मी सदैव सर्वसामान्यांसाठी काम करेन, अशी ग्वाही मेहबुबा यांनी दिली. बैठकीत सहभागी होण्यापूर्वी त्या वडिलांच्या मजारवर गेल्या आणि पुष्पचक्र अर्पण केले.
मंगळवारी शपथविधी
आता सर्व घडामोडी योग्य प्रकारे होत गेल्या तर मेहबुबा मुफ्ती मंगळवारी, २९ मार्च रोजी जम्मू-काश्मीरच्या १३ व्या आणि पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27573

Posted by on Mar 26 2016. Filed under ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य (572 of 2452 articles)


नवी दिल्ली, [२५ मार्च] - जम्मू-काशिमरात पीडीपी-भाजपाचे सरकार स्थापन होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. येत्या एकदोन दिवसात राज्यातील पहिल्या महिला ...

×