Home » ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य » मेहबूबा मुफ्ती यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

मेहबूबा मुफ्ती यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

mehbooba-muftiश्रीनगर, [४ एप्रिल] – पीडीपी पक्षाच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी सोमवारी सकाळी जम्मू – काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. ५६ वर्षीय मेहबूबा या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत. राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
मेहबूबा मुफ्ती यांच्यासह आघाडीचे १६ कॅबिनेट व ८ राज्यमंत्र्यानी पदाची शपथ घेतली. भाजपचे डॉ. निर्मल सिंह यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यातील भाजपाच्या दोन मंत्र्यांना स्वतंत्र प्रभार देण्यात आला आहे. पीडीपीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मंत्रिमंडळातील पक्षाचे सर्व मंत्री कायम राहतील. यावेळी केंद्रीय मंत्री व्यंकेय्या नायडू व जितेंद्र सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच भाजपचे नेते राम माधव यांच्यासह राज्याचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्लाही उपस्थित होते.
मेहबूबा या देशातील दुसर्‍या महिला मुस्लिम मुख्यमंत्री बनल्या आहेत. यापूर्वी ६ डिसेंबर १९८० रोजी सईदा अन्वरा तायमूर यांना देशातील पहिल्या मुस्लिम मुख्यमंत्री बनल्या होत्या.
दरम्यान, जम्मू – काश्मीरचे मुख्यमंत्री आणि पीडीपी पक्षाचे प्रमुख मुफ्ती मोहम्मद सईद यांचे जानेवारी महिन्यात निधन झाले. त्यानंतर त्यांच्या जागेवर मेहबूबा मुफ्ती आज मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27706

Posted by on Apr 5 2016. Filed under ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य (528 of 2452 articles)


=केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन= नाशिक, [३ एप्रिल] - केंद्रातील भाजपा सरकारने अंमलात आणलेल्या आर्थिक धोरणांमुळे देशात पाच वर्षात ...

×