Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » मेहर तरारची चौकशी होण्याची शक्यता

मेहर तरारची चौकशी होण्याची शक्यता

=सुनंदा पुष्कर हत्या प्रकरण=
mehar-tararनवी दिल्ली, [१२ मार्च] – सुनंदा पुष्कर यांच्या हत्येप्रकरणी पती शशी थरूर आणि इतरांची चौकशी केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी यासाठी स्थापन केलेले विशेष तपास पथक (एसआयटी) लवकरच पाकिस्तानी पत्रकार मेहर तरारची चौकशी करण्याची शक्यता आहे.
राजधानी दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलात सुनंदाचा मृतदेह आढळून येण्यापूर्वी शशी थरूर व मेहर तरार यांच्यातील कथित संबंधांबाबत त्या दोघींमध्ये ट्विटरयुद्ध रंगले होते. गरज पडल्यास मेहर तरारचीही चौकशी करण्यात येईल, असे दिल्लीचे पोलिस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी सांगितले. याप्रकरणी तरार यांना अद्याप कोणतीही नोटीस पाठविलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मेहर तरार यांचा या प्रकरणाशी संबंध असल्यामुळे त्या यावर अधिक प्रकाश टाकू शकतात. त्यामुळे त्यांच्याकडून माहिती गोळा करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही बस्सी म्हणाले.
दरम्यान, या प्रकरणी दिल्ली पोलिसांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास आपण तयार असल्याचे मेहर तरार यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. गरज पडल्यास शशी थरूर यांचीही पुन्हा चौकशी केली जाऊ शकते, असेही बस्सी यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21313

Posted by on Mar 13 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1927 of 2453 articles)


वॉशिंग्टन, [१२ मार्च] - भारतात सध्या स्वाईन फ्लूचा खूपच फैलाव झाला आहे. स्वाईन फ्लूचा एच१ एन१ हा व्हायरस अधिक धोकादायक ...

×