Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » मोदींची पाठ फिरताच झाली होती शरीफ-दाऊद भेट

मोदींची पाठ फिरताच झाली होती शरीफ-दाऊद भेट

=इंग्रजी वृत्तपत्राचा दावा=
dawood-sharifनवी दिल्ली, [१३ जानेवारी] – गेल्या २५ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानचा दौरा संपवून अचानक लाहोरला भेट दिली होती. सुमारे दीड तास पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर नरेंद्र मोदी मायदेशी रवाना झाले. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी नवाझ शरीफ यांनी मुंबई बॉम्बस्फोट मालिकेचा सूत्रधार दाऊद इब्राहिमची भेट घेतली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नवाझ शरीफ यांच्या नातीच्या विवाहाचे दाऊदलाही निमंत्रण होते. त्यासाठी २६ डिसेंबर रोजी दाऊद आपल्या परिवारासह लाहोरला आला होता. याच सोहळ्यात भारतातील काही बडे उद्योगपती आणि मुंबईतील काही व्यक्तीही उपस्थित होते. तेव्हा नवाझ शरीफ यांनी दाऊदची भेट घेऊन काही वेळ चर्चा केली होती, असे वृत्त या दैनिकाने विवाह सोहळ्यातील उपस्थित एका भारतीय उद्योगपतीच्या हवाल्याने दिले आहे.
मार्च १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेचा मुख्य सूत्रधार असलेला दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानातच असल्याचा दावा आणि तो सिद्ध करणारे ठोस पुरावे भारताने पाकला अनेकदा दिल्यानंतरही दाऊद आमच्या देशात नसल्याचा दावा पाक सरकारने वारंवार केला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26516

Posted by on Jan 14 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (916 of 2458 articles)


=विदेशी व्यवहारांवर ‘रॉ’ची नजर= नवी दिल्ली, [१३ जानेवारी] - भारतीय शेअर बाजारात काळा पैसा येण्याची शक्यता असल्याच्या वृत्ताच्या पार्श्‍वभूमीवर संशयास्पद ...

×