Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » मोदींची वकृत्वक्षमता अद्‌भुतच

मोदींची वकृत्वक्षमता अद्‌भुतच

=शशी थरूर यांची स्तुतिसुमने=
shashi-tharoor-2नवी दिल्ली, [१ फेब्रुवारी] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपात केंद्रात ‘मास्टर कम्युनिकेटर’ आला असल्याचे आज आपण सारेच बघत आहोत. संदेशवहन हीच भाजपाप्रणीत रालोआ सरकारची विशेषत: नरेंद्र मोदी यांची ताकद आहे. मोदी यांची वकृत्व क्षमता अद्‌भुत अशीच आहे, अशी स्तुतिसुमने कॉंगे्रस खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी उधळली.
‘‘भाषण देण्यात मोदी खरोखरच मास्टर आहेत. त्यांची नारेबाजी, आवाजातील चढ-उतार, त्यांची वेशभूषा याची बरोबरी कुणीही करू शकत नाही. ते मास्टर कम्युनिकेटर आहेत. त्यांच्यातील हा गुण इतर कुणातही नाही,’’ असे शशी थरूर यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
थरूर यांनी यापूर्वी मोदी यांची स्तुती केली आहे आणि त्यासाठी त्यांना कॉंगे्रस नेतृत्वाच्या रोषाचा सामनाही करावा लागला होता. तथापि, पक्षाला न जुमानता त्यांनी आज रविवारी पुन्हा एकदा मोदी यांची स्तुती केली. या देशातील नागरिकांनी मोदी यांच्या रूपात ‘मॅन ऑफ ऍक्शन’ला निवडून दिले आहे. त्यामुळे मोदी यांनी देशवासीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तातडीने कृती करायला हवी. कारण, देशातील जनता त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे, असेही त्यांनी सांगितले. याचवेळी त्यांनी आपण भाजपाच्या वाटेवर असल्याच्या वृत्ताचे खंडन केले. माझी संस्कृती कॉंगे्रसी आहे आणि आयुष्यभर मी कॉंगे्रसमध्येच राहणार आहे, असे ते म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20203

Posted by on Feb 2 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (2139 of 2453 articles)


=मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन, हिंगणा एमआयडीसी असोसिएशनचा वर्धापन दिन= नागपूर, [१ फेब्रुवारी] - येत्या काळात विदर्भात उद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार ...

×