Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » मोदींच्या आगामी चीनभेटीची चिनी माध्यमांकडून दखल

मोदींच्या आगामी चीनभेटीची चिनी माध्यमांकडून दखल

suit narendramodiबीजिंग, [३ फेब्रुवारी] – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी मे महिन्यात चीनचा दौरा करणार आहेत. मोदी यांच्या या आगामी भेटीची चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी आतापासूनच ठळक शब्दात दखल घेतली आहे.
‘सिल्क रोड प्रोजेक्ट’ संदर्भात चीनने भारताच्या शंकांचे निरसन करावे, असेही माध्यमांनी म्हटले आहे. चायना डेली, ग्लोबल टाईम्स आणि पीपल्स डेली या वृत्तपत्रांनी विदेश मंत्री सुषमा स्वराज व चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या भेटीला मुखपत्रावर ठळकपणे प्रसिद्धी दिली आहे. तर, टेलिव्हिजन आणि सी टीव्हीने देखील या भेटीला प्रचंड प्रसिद्धी दिली आहे.
‘नरेंद्र मोदी मे महिन्यात चीनचा दौरा करणार आहेत’ या शीर्षकाखाली ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्राने चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या ‘भारत आणि चीनने शांततापूर्ण मार्गाने आपसातील मतभेद सोडवावे’ या मथळ्याची ठळक शब्दात नोंद घेतली आहे. या भेटीमुळे दोन देशांमधील परस्पर विश्‍वास, गुंतवणूक आणि व्यापारी संधीसोबतच सीमावादावरील प्रश्‍न सोडविण्यासाठी मदत होईल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20288

Posted by on Feb 4 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (2129 of 2458 articles)


=राज्य सरकारचा निर्णय= मुंबई, [३ फेब्रुवारी] - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काही काळ वास्तव्य केलेले लंडन येथील घर खरेदी ...

×