Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » मोदींच्या नेतृत्वातच लढणार बिहार निवडणूक

मोदींच्या नेतृत्वातच लढणार बिहार निवडणूक

=अनंत कुमार यांची माहिती=
ananth kumarपाटणा, [१६ जून] – बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जदयु-राजद आघाडीने नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केल्यानंतर, भाजपानेही आपला उमेदवार जाहीर करावा, अशी मागणी राजदकडून होत असताना, भाजपाने आज मंगळवारी नरेंद्र मोदी यांच्या विकास अजेंड्याच्या आधारावरच आम्ही बिहार विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले.
याच वर्षीच्या अखेरीस होत असलेली विधानसभा निवडणूक म्हणजे लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार यांचे जंगलराज आणि नरेंद्र मोदी यांचा विकास व सुशासनाचा अजेंडा यांच्यातील लढाईच आहे, असे सांगताना, बिहारमधील जनता लालू-नितीश यांचे जंगलराज धुडकावून लावतील आणि नरेंद्र मोदींच्या विकास अजेंड्याचाच स्वीकार करतील, असा विश्‍वास भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय रसायन व खत मंत्री अनंत कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
भाजपाने अनंत कुमार यांची बिहार विधानसभा निवडणुकीकरिता पक्षाचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. बिहार निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल. त्यासाठी आम्हाला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याची गरज नाही. नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक लढविणार आहोत. नवनिर्वाचित आमदारच आपला नेता निवडतील, असेही त्यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22997

Posted by on Jun 17 2015. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (1611 of 2452 articles)


=केंद्राचा शेतकर्‍यांना मोठा दिलासा : एकनाथ खडसे यांची माहिती= नवी दिल्ली, [१५ जून] - अवकाळी पाऊस, गारपीट आणि आता कमी ...

×