|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:08 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.22° C

कमाल तापमान : 31.07° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 61 %

वायू वेग : 4.91 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.07° C

Weather Forecast for
Saturday, 20 Apr

28.31°C - 31.99°C

broken clouds
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

27.79°C - 31.42°C

light rain
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.78°C - 30.14°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

27.22°C - 30.08°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

27.13°C - 29.97°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

26.87°C - 29.96°C

sky is clear
Home » ठळक बातम्या, विदर्भ » मोदींनी केली फडणवीस, अहिर यांची प्रशंसा

मोदींनी केली फडणवीस, अहिर यांची प्रशंसा

nagpurनागपूर, [७ ऑक्टोबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी नागपूर जिल्ह्यातील भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी कस्तूरचंद पार्कवर आयोजित विराट जाहीर सभेत प्रदेश भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रपूरचे खासदार हंसराज अहिर यांची मुक्त कंठाने प्रशंसा केली.
विशेष म्हणजे नरेंद्र मोदी हे कौतुकोद्‌गार काढत असताना देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर उपस्थित होते आणि अतिशय विनम्रपणे जनसमुदायाला अभिवादन करत याचा स्वीकार करत होते. आ. फडणवीस दक्षिण-पश्‍चिम नागपूर मतदारसंघातील उमेदवारही आहेत.
देवेंद्र फडणवीस अतिशय धडाडीचे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी आतापर्यंत अनेक घोटाळे उघडकीस आणून सरकारला धारेवर धरले, लोकांचे प्रश्‍न सोडवले. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो, पण त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देणार्‍या नागपूरकरांचेही अभिनंदन करतो, असे मोदी यांनी म्हणताच उपस्थित जनतेने टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.
चंद्रपूरचे खासदार हंसराज अहिर यांचाही गौरवपूर्ण उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, हंसराज अहिर यांनी संसदेत अनेक प्रश्‍न उपस्थित करत आपल्या भागाच्या विकासाला गती दिली. एवढेच नाही, तर कोट्यवधी रुपयांचा कोळसा घोटाळा उघडकीस आणून सरकारचा भ्रष्ट चेहराही जनतेसमोर आणला. त्यामुळे त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा हे दोघांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. मोदी यांनी आ. देवेंद्र फडणवीस आणि खा. हंसराज अहिर यांच्या मुक्तकंठाने केलेल्या प्रशंसेला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

Posted by : | on : 8 Oct 2014
Filed under : ठळक बातम्या, विदर्भ
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g