Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » मोदींनी दिल्या जयललिता, ममता बॅनर्जींना शुभेच्छा

मोदींनी दिल्या जयललिता, ममता बॅनर्जींना शुभेच्छा

Mamata_modi_Jayaनवी दिल्ली, [१९ मे] – पं. बंगालसह पाच राज्यांतील निवडणुकांची मतमोजणी आज सकाळपासून सुरू झाली आहे. आतापर्यंतच्या निकालावरून विधानसभा निवडणुकीत अण्णा द्रमुकच्या जयललिता पुन्हा एकदा सत्तेत येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे पं. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार पुन्हा येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळविल्याबद्दल जयललिता व ममता बॅनर्जी यांचे दूरध्वनीवरून आज गुरूवारी अभिनंदन केले आहे.
आज सकाळपासून मतमोजणी सुरू झाली असून यात आसामचाही समावेश आहे. विधानसभेच्या १२६ पैकी ११६ जागांचे कल आतापर्यंत हाती आले आहेत. त्यापैकी भाजप, आसाम गण परिषद व बोडो पीपल्स फ्रंट ही युती तब्बल ७३ जागांवर आघाडीवर आहे. तर गेली १५ सत्तेत असलेल्या कॉंग्रेसला केवळ २४ जागा मिळाल्या आहेत. तसेच बद्रद्दिन अजमल यांच्या ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंटची १५ जागांवर सरशी झाली आहे.
तामिळनाडूमध्ये ३२ वर्षांचा इतिहास बदलून जयललिता यांना बहुमत मिळाले आहे. जयललिता व ममता बॅनर्जी यांचे पुन्हा सरकार येणार असल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. दरम्यान, आसाम व केरळमध्ये प्रथमच भाजप सरकार स्थापन करणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28336

Posted by on May 19 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (318 of 2453 articles)


=थरूर, ज्योतिरादित्यांचा घरचा अहेर= नवी दिल्ली, [१९ मे] - पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पुद्दुचेरी वगळता इतरत्र सफाया झालेल्या कॉंग्रेसवर त्याच ...

×