Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » मोदींमुळेच देशाला भवितव्य लाभले

मोदींमुळेच देशाला भवितव्य लाभले

=जेटलींचा मनमोहनसिंगांवर पलटवार=
arun jaitley5नवी दिल्ली, [१३ फेब्रुवारी] – नरेंद्र मोदी सरकारच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेची घडी विस्कळीत झाली, अशी टीका करणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज शनिवारी पलटवार केला. संपुआ सरकारच्या काळात अपंग धोरण प्रक्रियेमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली होती. पण, नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगातील सर्वाधिक उज्वल भवितव्याचा देश म्हणून भारत नावलौकिक झालेला आहे, असे उत्तर जेटली यांनी दिले.
‘डॉ. मनमोहनसिंग यांनी कॉंगे्रसला कोणता सल्ला द्यायला हवा’ असे शिर्षक असलेल्या फेसबुक पोस्टवर जेटली यांनी मनमोहनसिंग आणि त्यांच्या पक्षावर जोरदार हल्ला चढविला. संपुआ सरकारच्या काळात कॉंगे्रसचे मुख्यालय असलेल्या २४, अकबर रोडवरून सरकारची धोरणे निश्‍चित केली जायची. पण, भाजपाप्रणीत रालोआ सरकारमध्ये केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच शब्द अंतिम आहे. माजी राष्ट्रपती किंवा माजी पंतप्रधान क्वचितच बोलत असतात. पण, जेव्हा ते बोलतात, तेव्हा संपूर्ण देश काळजीपूर्वक ऐकत असते. त्यामुळे त्यांनी निष्पक्षपणे बोलायला हवे, त्यांचा सल्ला रचनात्मक असावा आणि त्यांनी आपल्या स्वत:च्या पक्षालादेखील राष्ट्रहितात काम करण्याचा कडक संदेश द्यायला हवा. माझ्या मनात मनमोहनसिंग यांच्याबद्दल अजूनही प्रचंड आदर आहे. तेव्हा त्यांच्याकडूनही मला तशाच सन्मानाची अपेक्षा आहे, असे जेटली यांनी म्हटले आहे.
मनमोहनसिंग यांची मुलाखत मी काळजीपूर्वक ऐकली आहे. त्यांनी जर संपुआ आणि रालोआ सरकारच्या कामाचे गंभीरपणे विश्‍लेषण केले असते, तर त्यांना सत्यता कळली असती. रालोआ सरकारमध्ये पंतप्रधान मोदी यांचाच शब्द अंतिम आहे. या सरकारमध्ये नैसर्गिक स्रोतांच्या वाटपाची प्रक्रिया पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त पद्धतीने करण्यात येत आहे. सरकारमधील कामाचे स्वरूप बदलले आहे, याकडेही जेटली यांनी लक्ष वेधले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26833

Posted by on Feb 14 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (828 of 2453 articles)


=भाजपाची मागणी= अलाहाबाद, [१३ फेब्रुवारी] - लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी आणि मुंबईवरील हल्ल्याचा एक सूत्रधार डेव्हीड हेडलीच्या कबुलीमुळे भारतातील सर्वच दहशतवादी हल्ल्यांमागे ...

×