Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » मोदींविरुद्ध याचिका अमेरिकन न्यायालयाने फेटाळली

मोदींविरुद्ध याचिका अमेरिकन न्यायालयाने फेटाळली

narendra_modi_slन्यूयॉर्क, [१५ जानेवारी] – २००२ च्या गुजरात दंगलीप्रकरणी येथील काही मानवाधिकार कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका अमेरिकन न्यायालयाने फेटाळून लावली असून, एका देशाचे प्रमुख या नात्याने त्यांना या सर्व गोष्टींमधून सूट असल्याची ओबामा प्रशासनाने मान्य केली आहे.
विदेशी सरकारचे प्रमुख या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या सर्व बाबींमधून सूट आहे हे कार्यकारी शाखेने स्पष्ट केल्यानंतर या याचिका प्रकरणातील या न्यायालयाच्या कक्षेतून त्यांना तशीच सूट आहे, असे सांगून दक्षिण न्यूयॉर्क जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीश ऍनालिसा टोरेस यांंनी बुधवारी ही याचिका फेटाळून लावली. याबाबत याचिकाकर्ते प्लेंटिफ्स अमेरिकन जस्टिस सेंटरने (एजेसी) केलेल्या युक्तिवादात काहीही गुणवत्ता नाही आणि तो खात्रीलायकही नाही. त्यामुळे ही तक्रार फेटाळून लावण्यात येत आहे आणि न्यायालय हे प्रकरण बंद करण्याचे निर्देश देत आहे, असे टोरेस यांनी आपल्या तीनपानी आदेशात स्पष्ट केले.
टोरेस यांनी आपला निर्णय देताना अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला दिला आहे. अमेरिकन सरकारने ज्या प्रकरणात सूट दिली आहे त्यामध्ये न्यायालयाला ती नाकारता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर एजेसी किंवा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा येत्या २६ जानेवारी रोजी साजर्‍या होणार्‍या भारताच्या प्रजासत्ताकदिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतात येण्याच्या तयारीत असतानाच न्यायालयाचा हा मोठा निर्णय आला आहे. न्यूयॉर्कस्थित एजेसीने गेलयावर्षीच्या सप्टेंबर महिन्यात संयुक्त राष्ट्र संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भाषण करण्यासाठी पंतप्रधान मोदी अमेरिकेत येण्यापूर्वी दाखल केला होता.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19739

Posted by on Jan 16 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (2230 of 2458 articles)


=अकृषक परवानगी मिळाल्यानंतर नियोजन करा : मुख्यमंत्र्यांचे आदेश= मुंबई, [१५ जानेवारी] - औद्योगिक वापराकरिता अकृषक परवानगी घेतल्यानंतर त्या जमिनीवर पाच ...

×