Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » मोदी आता जगाचे पंतप्रधान

मोदी आता जगाचे पंतप्रधान

=लालूप्रसाद यादव यांची टीका=
laluprasad-yadavरांची, [१३ जून] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दर दोन-तीन महिन्यांनंतर होणार्‍या विदेश दौर्‍यावरून त्यांच्यावर विरोधक सातत्याने टीका करीत असतात. तसेच सोशल मीडियातूनही त्यांच्या विदेश दौर्‍यांंबाबत टीकाटिप्पणी होत असते. आता राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनीसुद्धा त्यांच्या विशेष स्टाईलमध्ये मोदींच्या विदेश दौर्‍यावर टीका केली आहे.
चारा घोटाळ्याच्या खटल्याच्या सुनावणीसाठी स्थानिक न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी आले असता लालू यांनी ही टीका केली.
मोदी हे एनआरआय बनले आहेत, असे सांगून लालू म्हणाले की, मोदी भारताचे पंतप्रधान आहेत, मात्र सर्वाधिक काळ ते देशाबाहेरच असतात. त्यामुळे मोदींसाठी जगाचे पंतप्रधान असे पद तयार करावे, अशी अपील मी जगभरातील नेत्यांना करू इच्छितो.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28573

Posted by on Jun 13 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (245 of 2453 articles)


=भाजपाच्या बैठकीत आर्थिक प्रस्तावातून विश्‍वास= अलाहाबाद, [१३ जून] - जागतिक मंदीच्या काळातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत आर्थिक महासत्ता ...

×