Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » मोदी ओबामांसह अनेक जागतिक नेत्यांना भेटणार

मोदी ओबामांसह अनेक जागतिक नेत्यांना भेटणार

NARENDRA MODI39न्यूयॉर्क, [२४ सप्टेंबर] – भारताचे पंतप्रधान म्हणून दुसर्‍या अमेरिका दौर्‍यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भरगच्च कार्यक्रमात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह जगभरातील डझनभर प्रभावशाली नेत्यांची भेट घेणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना भेटतील तेव्हा उभय नेत्यांची वर्षभरातील ही तिसरी द्विपक्षीय भेट असेल. यावेळी मोदी द्विपक्षीय, विभागीय आणि जागतिक मुद्यांसह वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या धोरणात्मक चर्चेनंतर दोन्ही देशांच्या सरकारांनी घेतलेल्या निर्णयावरही ओबामा यांच्याशी चर्चा करतील, अशी माहिती भारताचे अमेरिकेतील राजदूत अरुण के. सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी राजकीय, द्विपक्षीय, विभागीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर उभय नेते विचारांचे आदानप्रदान करतील, असेही त्यांनी सांगितले. ओबामा-मोदी भेट २८ सप्टेंबरला होणार आहे, असे परराष्ट्र सचिव विकास स्वरूप यांनी सांगितले असले तरी, बैठकीचे ठिकाण अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.
सहा दिवसांच्या अमेरिका मुक्कामात मोदी फ्रान्स, जॉर्डन, भूतान, मेक्सिको, स्वीडन, कतार आणि पॅलेस्टाईन या देशांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. याशिवाय न्यूयॉर्क येथेच होणार्‍या जी-४ परिषदेत पंतप्रधान जपानचे पंतप्रधान शिंझो आबे, जर्मनीच्या चान्सलर ऍन्जेला मर्केल आणि ब्राझीलच्या अध्यक्षांशी चर्चा करतील, असेही स्वरूप यांनी सांगितले. यावेळी सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतील त्या २८ सप्टेंबरला होणार्‍या पहिल्या धोरणात्मक आणि व्यावसायिक चर्चेच्या समारोपावर. व्यावसायिक संबंध अधिक वृद्धिंगत करण्याच्या हेतूने धोरणात्मक चर्चेला हा एक मुद्दा जोडण्यात आला, असे स्वरूप म्हणाले.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा जानेवारी महिन्यात भारताच्या भेटीवर आले असता दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय व्यापार ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट जाहीर केले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24028

Posted by on Sep 25 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1422 of 2458 articles)


नवी दिल्ली, [२२ सप्टेंबर] - नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी केलेल्या परदेश दौर्‍यांमुळे भारतातील थेट परकीय गुंतवणुकीत (एफडीआय)मध्ये ...

×