Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » मोदी चिनी सोशल मीडियावर ‘हॅलो चायना’

मोदी चिनी सोशल मीडियावर ‘हॅलो चायना’

narendra modi 10बिजींग, [४ मे] – पुढच्या आठवड्यात चीनच्या दौर्‍यावर जाणार असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या ‘वेइबो’ या मायक्रोब्लॉगिंग साईटवर आपले खाते उघडले आहे. विशेष म्हणजे चिनी सोशल मीडियायावर दाखल झालेले ते पहिले भारतीय नेते ठरले आहेत.
या साईटवर ५० कोटींपेक्षा जास्त चिनी नागरिक सक्रिय असून ही साईट साधारणपणे ट्विटरसारखीच असून त्यावर आपल्या खात्याच्या पहिल्याच पोस्टमध्ये मोदी यांनी ‘हॅलो चायना’ असे चिनी भाषेत लिहिले आहे. ‘वेइबोच्या माध्यमातून चिनी मित्रांशी संपर्क साधण्यास मी खूप उत्सुक आहे,’ असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. ‘कनेक्ट विथ पीएम नरेंद्र मोदी’ या त्यांच्या खात्याला सुरुवात होताच काही तासांतच सुमारे सात हजार लोकांनी त्यांचे स्वागत करणार्‍या प्रतिक्रिया दिल्या. त्यात लोकांनी पंतप्रधानांचे कौतुक केले असून चिनी मायक्रोब्लॉगिंगसोबत जोडल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय नेत्यांनी वेइबोवर आपली खाती उघडली आहेत.
गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अनेकदा चीनला भेट दिली असली तरी भारताचे पंतप्रधान म्हणून ते प्रथमच चीनला जाणार आहेत. १४ ते १६ मे अशा या कालावधीत उभयपक्षी सीमाप्रश्‍नासह विविध मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. दौर्‍यावर रवाना होण्यापूर्वी मोदी नक्कीच आपल्या पोस्टमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22412

Posted by on May 5 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1731 of 2458 articles)


=महिला आयोगाने बजावली नोटीस= नवी दिल्ली, [४ मे] - स्वच्छ राजकारणाचे धडे देण्याच्या गप्पा करून देशाच्या राजकारणात उतरलल्या आम आदमी ...

×