Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » मोदी सरकारची धोरणे कार्यक्षम नाही

मोदी सरकारची धोरणे कार्यक्षम नाही

=येचुरी यांची टीका=
Sitaram-Yechury1नवी दिल्ली, [४ मे] – विदेशी गुंतवणुकीला आकर्षित करणारी आणि उद्योगांना कर सवलत देणारी नरेंद्र मोदी सरकारची धोरणे कार्यान्वित होण्यासारखी नाहीत. कारण, लोकांची क्रयशक्ती फारच कमी असल्याने ही धोरणे फलदायी परिणाम देणारी ठरू शकणार नाही, अशी टीका माकपचे नवनिर्वाचित सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केली.
या चुकीच्या धोरणांनीच सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपाने देशवासीयांना जी मोठमोठी वचने दिली होती, त्यांची पूर्तता करण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. शिवाय, आर्थिक आघाडीवर मोदी सरकारने जी पावले उचलली आहेत, त्यामुळे स्थिती आणखीच भीषण झाली आहे, असा आरोपही येचुरी यांनी केला.
यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ अभियानावरही टीकास्त्र सोडले. या ऐवजी ‘मेक फॉर इंडिया’ हे अभियान सरकारने राबवायला हवे होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22416

Posted by on May 5 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1725 of 2453 articles)


बिजींग, [४ मे] - पुढच्या आठवड्यात चीनच्या दौर्‍यावर जाणार असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या ‘वेइबो’ या मायक्रोब्लॉगिंग साईटवर आपले ...

×