Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » मोदी सरकारचे दोन वर्षांचे काम उत्तम

मोदी सरकारचे दोन वर्षांचे काम उत्तम

  • राजनयिक, रेल्वेतील सुधारणांना विशेष पसंती
  • ऑनलाईन सर्वेक्षणातील निष्कर्ष

narendra-modi-11नवी दिल्ली, [७ जून] – केंद्रातील सत्तेची दोन वर्षे पूर्ण करणार्‍या नरेंद्र मोदी सरकारविषयी लोकांना काय वाटते, याबाबत अलीकडेच करण्यात आलेल्या ऑनलाईन सर्वेक्षणाचा अहवाल समोर आला आहे. या सरकारच्या कामगिरीवर सर्वच स्तरांमधून कौतुकाचा वर्षाव होत असून, विशेषत: राजनयिक पातळीवर झालेले काम आणि रेल्वेतील सुधारणांना नागरिकांनी विशेष पसंती दिली आहे.
सरकारची दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच, नागरिकांनी आपल्या सरकारच्या कामगिरीचे मूल्यांकन करावे आणि सरकारच्या mygov.in या संकेतस्थळावर मत नोंदवावे, असे आवाहन केले होते. या ऑनलाईन सर्वेक्षणात सुमारे २० हजार नागरिक सहभागी झाले होते. याच संकेतस्थळावर नागरिकांसाठी प्रश्‍नमंजुषाही सुरू करण्यात आली होती आणि २० प्रश्‍नांची अचूक उत्तरे देणार्‍यांना थेट पंतप्रधान मोदी यांना भेटण्याची आणि त्यांच्याच हस्ते प्रमाणपत्र स्वीकारण्याची संधीही देण्यात आली होती.
या ऑनलाईन सर्वेक्षणाचा तसेच प्रश्‍नमंजुषेचा निकाल सरकार उद्या बुधवारी जाहीर करणार आहे. ऑनलाईन सर्वेचा निकाल मोबाईलवरील एसएमएसवर प्राप्त होणार आहे. यासाठी १८००११७८०० हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. याशिवाय, नागरिक ०९८१४२००१०० या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकतात. त्यांना लगेच कॉल करण्यात येईल आणि त्यांचेही मत विचारात घेतले जाईल. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही संकेतस्थळांवर हा निकाल उपलब्ध होणार आहे.
या ऑनलाईन सर्वेक्षणाचे निकाल मोदी सरकारच्या कारकीर्दीवर पसंतीची मोहर उमटविणारेच आहेत. बहुतांश लोकांनी रेल्वेत करण्यात आलेल्या सुधारणांना पसंती दिली आहे. रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग क्षेत्राला ४.५, विदेश धोरणाला ४.४, मेक इन इंडियाला ४.२ आणि ऊर्जा मंत्रालयाला ४.१ इतके गुण मिळाले आहेत. या सर्व क्षेत्रांवर पाच गुण होते. काळा पैसा परत आणणे आणि स्वच्छ भारत अभियान या सरकारच्या महत्त्वाकांक्षी धोरणांवरही लोकांनी मत दिले आहे. स्वच्छ भारत अभियानाला ३.८ आणि काळा पैसा परत आणण्याच्या धोरणाला ३.४ गुण मिळाले आहेत. शैक्षणिक दर्जा सुधारण्यात सरकारला आणखी बरेच काही करावे लागणार आहे, असेही बहुतांश नागरिकांनी नमूद केले. तथापि, सरकारमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा हाताळण्यात मोदी सरकार जवळजवळ यशस्वी राहिले असल्याचे मत ८२ टक्के लोकांनी व्यक्त केले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28534

Posted by on Jun 8 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (257 of 2453 articles)


=अमेरिकेनेही जाहीर केला पाठिंबा= वॉशिंग्टन, [७ जून] - ४८ सदस्यीय न्यूक्लियर सप्लायर्स गु्रपमध्ये (एनएसजी) भारताच्या सदस्यत्वाला अमेरिकेनेही आज मंगळवारी आपला ...

×