Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » मोदी सरकारच्या कामावर जनता खुश

मोदी सरकारच्या कामावर जनता खुश

=एबीपी माझा-नील्सनचा सर्व्हे=
One-year-old Modi Government Draws Success Stories of Common Menनवी दिल्ली, [२४ मे] – केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार लवकरच सत्तेतील एक वर्ष पूर्ण करीत आहे. सरकारच्या एका वर्षाच्या कामगिरीवर देशातील बहुतांश नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या सरकारने अवघ्या एक वर्षात खरोखरच चांगली कामे केली आहेत, असे सांगणारा वर्ग फार मोठा असल्याचे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त करण्यात आलेल्या एका ताज्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.
एबीपी माझा आणि नील्सनने यासाठी केलेल्या सर्वेक्षणात मोदी सरकारच्या वर्षभरातील कामगिरीविषयी देशवासीयांचे मत जाणून घेतले. यात ‘अच्छे दिन’ आले का, ‘सब का साथ, सब का विकास’ ही घोषणा प्रत्यक्षात खरी ठरली का, यासह अनेक प्रश्‍नांची उत्तरे जनतेकडून प्राप्त करण्यात आली.
नरेंद्र मोदी सरकारच्या एका वर्षाच्या कामकाजावर सुमारे ४८ टक्के जनता समाधानी असल्याचे दिसून आले आहे, तथापि, पाहिजे तसे जीवनमान अद्यापही सुधारले नसल्याचे मतही जनतेकडून व्यक्त होत आहे. असे असले, तरी सरकारने जी धोरणे राबविली आहेत, त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसून येतील, असा विश्‍वासही जनतेच्या मनात आहे. मोदी सरकारचा उर्वरित चार वर्षांचा कार्यकाळ यापेक्षाही चांगला राहील, अशी आशाही जनतेला असल्याचे या अभ्यासात दिसून आले आहे.
भाजपाप्रणीत रालोआ सरकारने अवघ्या एकाच वर्षात जनहिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. हे सरकार खरोखरच चांगले काम करीत आहे, असे मत देशातील ४८ आणि महाराष्ट्रातील ४३ टक्के लोकांनी व्यक्त केले आहे. तर, मोदी सरकारची कामगिरी साधारण आहे, असे देशातील ३५ आणि महाराष्ट्रातील ४१ टक्के लोकांचे मत आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यात भाजपाप्रणीत रालोआ सरकार केंद्रात सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची कामगिरी कशी आहे, या प्रश्‍नाच्या उत्तरात सुमारे ६२ टक्के लोक अतिशय खुश असल्याचे दिसून आले. तर, २७ टक्के लोकांनी साधारण कामगिरी, असे उत्तर दिले आहे. मोदी यांची कामगिरी वाईट असल्याचे सांगणारा वर्ग केवळ ९ टक्क्यांच्या घरात आहे.
नरेंद्र मोदी यांनी निवडणूकपूर्व सभांमध्ये ज्या ‘अच्छे दिन’ची ग्वाही देशवासीयांना दिली होती, ते चांगले दिवस वर्षभरातच पाहायला मिळाले आहेत, असे ४८ टक्के लोकांनी म्हटले आहे. तर, ४४ टक्के लोकांनी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट केले. देशाला चांगले दिवस आले, असे महाराष्ट्रातील ४२ टक्के जनतेला वाटते. विशेष म्हणजे, मोदी सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप कॉंगे्रस पक्ष आणि अन्य विरोधक करीत असताना, ४५ टक्के लोकांनी मोदी सरकारने शेतकर्‍यांना खर्‍या अर्थाने न्याय दिला आहे, शेतकर्‍यांवर नैसर्गिक संकट आले असताना, हे सरकार तातडीने मदतीसाठी धावून गेले आहे, असे मत व्यक्त करून विरोधकांच्या आरोपांची हवाच काढली आहे. या सरकारच्या काळात आमचे जीवनमान सुधारले, असा सांगणारा २८ टक्के वर्ग आहे. तर, अद्यापही पाहिजे तसा फरक पडलेला नाही, असे ५९ टक्के लोकांचे मत आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22688

Posted by on May 25 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1662 of 2453 articles)


=पोलिस अधीक्षकांना धमकीचे पत्र= लखनौ, [२४ मे] - केंद्रातील भाजपाप्रणीत रालोआ सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपाने उद्या सोमवारपासून देशभरात ‘जनकल्याण पर्व’ आयोजित ...

×