Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » मोदी सरकार योग्य मार्गावर

मोदी सरकार योग्य मार्गावर

  • ‘अच्छे दिन’ येतील, थोडा वेळ लागेल
  • लालकृष्ण अडवाणी यांचा विश्‍वास

advani_l_kअहमदाबाद, [२२ नोव्हेंबर] – देशात ‘अच्छे दिन’ आणण्याचा निर्धार घेऊन केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची वाटचाल योग्य मार्गावर सुरू आहे. देशवासीयांना ‘अच्छे दिन’ची अनुभूती येईल, पण त्यासाठी थोडा वेळ लागेल, असा विश्‍वास भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी यांनी आज रविवारी येथे व्यक्त केला.
अहमदाबाद महानगरपालिका निवडणुकीत खानपूर येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावल्यानंतर अडवाणी पत्रकारांशी बोलत होते. देशवासीयांना चांगले दिवस पाहायला मिळावे, यासाठी सरकारची वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्याने, त्यातून परिणामही नक्कीच चांगलेच दिसतील, असा मला विश्‍वास असल्याचे अडवाणी म्हणाले. देशासाठी ‘अच्छे दिन’ आणण्याचे वचन पूर्ण करण्यात मोदी सरकार अपयशी ठरले, असे तुम्हाला वाटते का, असा प्रश्‍न अडवाणी यांना विचारण्यात आला होता.
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यामुळे, येथील महानगर पालिका निवडणुकीविषयी तुम्हाला काय वाटते, असे विचारले असता, गुजरातमधील महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे, असे उत्तर त्यांनी दिले.
बिहारमधील पराभवामुळे पक्षाचा विवेक जागृत झाला आहे. भाजपा शक्तिनिशी निवडणूक लढवित असल्याने, या निवडणुकीचे परिणामही निश्‍चितच भाजपासाठी अनुकूल असेच राहतील. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणेच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांनाही महत्त्व असते. या निवडणुकीत खासदारांनाही मतदानाची परवानगी देण्यात आल्याने मी समाधानी आहे, असेही त्यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25663

Posted by on Nov 23 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1176 of 2453 articles)


‘एक आशिया’ची संकल्पना स्वामींचीच पंतप्रधानांचे प्रतिपादन मलेशियात विवेकानंदांच्या पुतळ्याचे अनावरण क्वालालाम्पूर, [२२ नोव्हेंबर] - स्वामी विवेकानंद हे कुण्या एका ...

×