Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » मोबाईल कॉल्स महागणार!

मोबाईल कॉल्स महागणार!

talking on mobile phoneनवी दिल्ली, [१५ मार्च] – तासन्‌तास आपल्या जवळच्या व्यक्तींशी मोबाईलवर गप्पा मारणार्‍यांना यापुढे त्याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. दि सेल्युलर ऑपरेटर्स ऑफ इंडिया (सीओएआय) या संस्थेने व्यक्त केलेल्या भीतीनुसार, आगामी आर्थिक वर्षात मोबाईल कॉलदर वाढण्याची शक्यता आहे.
केंद्रीय अर्थमंत्रालयातर्फे मोबाईल स्पेक्ट्रमवर सेवाकर लावण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. केंद्र सरकार मोबाईल स्पेक्ट्रमचा लिलाव जून व जुलैमध्ये करणार आहे. त्यासाठी राखीव किंमत ५.३६ लाख कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. हे स्पेक्ट्रम खरेदी करण्यासाठी सेवाकर गृहित धरल्यास आधीच कर्जात असलेल्या मोबाईल कंपन्यांवर आणखी ७७ हजार कोटी रुपये कराचा बोजा पडणार आहे. हा बोजा मोबाईल कंपन्या ग्राहकांवरच टाकणार, ही बाब स्पष्ट आहे. परिणामी मोबाईल कॉल्स महागणार, असे संस्थेचे म्हणणे आहे.
हा प्रस्ताव मान्य करीत मोबाईल स्पेक्ट्रमवर सेवाकर वाढल्यास त्याचा फटका केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी डिजिटल इंडिया मोहिमेला व ‘४-जी’ सेवेला फटका बसू शकतो. त्याचप्रमाणे सर्वसमावेशक आर्थिक विकासामध्येही अडथळे येऊ शकतात. त्यामुळेच सेवाकर आकारण्याच्या प्रस्तावावर पुनर्विचार करण्याबरोबरच सरकारने दूरसंचार कंपन्यांवरील आयकराच्या बोज्याचाही विचार करावा, अशी मागणी सीओएआयने केली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27345

Posted by on Mar 16 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (651 of 2453 articles)


लखनौ, [१५ मार्च] - मानेवर सुरा ठेवला तरी भारत माता की जय म्हणणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे एमआयएमचे नेते ...

×