Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » …म्हणून उपराष्ट्रपतींनी दिली नाही सलामी

…म्हणून उपराष्ट्रपतींनी दिली नाही सलामी

Vice President Hamid Ansari doesn't salute national flagनवी दिल्ली, [२७ जानेवारी] – प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजपथवरील मुख्य समारंभातील उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांचा एक फोटो दोन दिवस सोशल मीडियावर चांगलाच गाजला. पण राजपथावर सलामीसाठी उपराष्ट्रपतींनी हात न उचलणे ‘प्रोटोकॉल’च्या दृष्टीने योग्य आहे. यासंदर्भात नियम असा आहे की, राष्ट्रपतींच्या गैरहजेरीतच उपराष्ट्रपतींना हा अधिकार आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनादरम्यान लष्कराकडून मानवंदना स्वीकारण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींचा असतो. राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीतच उपराष्ट्रपती सलामी स्वीकारू शकतात. दरम्यान, उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांचे विशेष अधिकारी गुरदीप सप्पाल यांनी या वादानंतर ट्विट करून याबाबत स्पष्टीकरण दिले. त्यानुसार, ‘राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यादरम्यान उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांनी सलामीसाठी हात न उचलणे हे अगदी योग्य होते. राष्ट्रपती उपस्थित असताना सलामीसाठी त्यांच्याशिवाय तिथे उपस्थित असलेल्या कोणीही सलामी देऊ नये.’ हा स्पष्ट नियम असल्याचेही सप्पाल यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
राजपथवर उपस्थित असलेल्या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी हात उचलून सलामी दिली. पण यावेळी उपराष्ट्रपतींनी मात्र मानवंदना दिली नसल्याचे या वादग्रस्त छायाचित्रात दिसत आहे. विशेष म्हणजे, दुसर्‍या एका छायाचित्रामध्ये फक्त राष्ट्रपती सलामी देत असल्याचे दिसत असून, अन्सारी, मोदी आणि संरक्षण मंत्री यांचे हात खाली आहेत. या छायाचित्रावर अनेक जणांनी आक्षेप नोंदवत हामिद अन्सारी यांच्यावर टीका केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20089

Posted by on Jan 28 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2166 of 2453 articles)


मियामी, [२७ जानेवारी] - विश्‍वसुंदरी स्पर्धेत या वर्षी ‘मिस कोलंबिया’ पॉलिना व्हेगा हिने बाजी मारली आहे. ‘मिस कोलंबिया’ याच टोपणनावाने ...

×