Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » म्हणून खास आहे ओबामांची बीस्ट

म्हणून खास आहे ओबामांची बीस्ट

नवी दिल्ली, [२३ जानेवारी] – अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा भारतात येणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडेकोट करण्यात आली आहे. संरक्षा बंदोबस्ताच्या निमित्ताने ओबामांची ‘बीस्ट’ गाडी चर्चेत आली आहे. सामान्य गाड्यांपेक्षा या गाडीत अनेक गोष्टी ‘खास’ आहेत आणि म्हणूनच ती महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची गाडी आहे.
‘कॅडिलेक वन’ नावाची ही गाडी तिच्या क्षमतांमुळे ‘बीस्ट’ म्हणून ओळखली जाते. ही गाडी रासायनिक आणि जैविक हल्ल्यांना परतवून लावण्यास सक्षम आहे. या गाडीसाठी आठ इंच जाडीचा स्टील, अल्युमिनियम, टायटॅनियम आणि सिरॅमिकचा पत्रा वापरण्यात आला असून त्याच्या बुलेटप्रूफ काचा पाच इंची आहेत. अठरा फूट लांब आणि साडेसात टन वजनाची बीस्ट ६० किलोमीटर प्रतितास वेगाने धावते. गाडीची पेट्रोल टँकही बुलेटप्रूफ आहे. गाडीत चार जण बसू शकतात आणि सामान्य चालकाऐवजी गुप्तहेर यंत्रणेचा विशेष प्रशिक्षित अधिकारी या गाडीचा चालक असतो. बीस्टमध्ये जीपीएस यंत्रणाही कार्यान्वित असून त्यात रात्री दृश्यमानता वाढविणारा कॅमेरा आणि अश्रूधुराचीही व्यवस्था आहे.
गाडीचे टायर फुटले तरीही गाडीची गती जराही कमी न होता ती धावू शकते. हे टायर्स गोपनीय पद्धतीने एका विशिष्ट कंपनीकडून बनवून घेतले जातात. विशेष म्हणजे सामान्य रॉकेट लॉंचर्सचा या गाडीवर काहीच परिणाम होत नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष या गाडीत बसलेले असताना पूर्ण वेळ वाय-फाय, सॅटेलाईट आणि डायरेक्ट फोनलाईनच्या माध्यमातून पेंटागॉन आणि अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांच्या संपर्कात राहतात. या सर्व बंदोबस्तातूनही हल्ला झालाच तर राष्ट्राध्यक्षांना वाचविण्याची पूर्ण सोय या गाडीत असते. त्यांच्या रक्तगटाच्या रक्तापासून ऑक्सीजन सिलेंडरपर्यंत सर्व सोयी या गाडीत आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20012

Posted by on Jan 24 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (2183 of 2453 articles)


=सुभाषचंद्र बोस यांची देशभक्ती प्रेरणादायी= नवी दिल्ली, [२३ जानेवारी] - नेताजी सुभाषचंद्र बोस यांची देशभक्ती आणि शौर्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायीच ...

×