Home » ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य » म्हणे, पुन्हा पाकचा जयजयकार करीन!

म्हणे, पुन्हा पाकचा जयजयकार करीन!

=मसरत आलमची मुजोरी कायम, कठोर कारवाईचे केंद्राचे आदेश=
masrat-alamश्रीनगर/नवी दिल्ली, [१६ एप्रिल] – जम्मू-काश्मीर सरकारने काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून सुटका केलेला फुटीरवादी नेता मसरत आलम याने बुधवारी श्रीनगर येथील रॅलीत ‘मेरी जान पाकिस्तान’चे नारे देतानाच भारताविरुद्ध गरळ ओकल्यानंतर देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांना यासंदर्भात कडक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, आपण अटकेला मुळीच घाबरत नसल्याची दर्पोक्ती मसरतने केली आहे. एवढेच नव्हे, तर रॅलीत पाकिस्तानचे झेंडे फडकविण्यात गैर काय?, अशी मुजोरीही त्याने केली आहे.
भारत विरोधी रॅली काढणार्‍यांना कुठल्याही परिस्थितीत मोकळे सोडू नका, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने मुक्ती सरकारला दिल्यानंतर लगेचच आलमने ही दर्पोक्ती केली आहे, हे विशेष. मुफ्ती सरकारच्या कृपेमुळेच आलमला असे वक्तव्य करण्याची हिंमत झाली, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. ‘माझ्याजवळ पाकिस्तानी झेंडा नव्हता. लोकांनी ते फडकवले. पण, मला त्यात काहीही गैर वाटत नाही’, असे आलमने सांगितले. ‘काश्मीर खोर्‍यात पाकिस्तानी झेंडे फडकविणे ही काही नवीन बाब नाही, १९४७ पासूनच असे होत आहे, अशी दर्पोक्ती करून ‘आपण यापुढेही पाकिस्तान समर्थनाचे नारे लावू, अटकेची मला मुळीच भीती नाही, याचा त्याने पुनरुच्चार केला. फुटीरवादी नेता आशिक हुसैन फक्तीची पत्नी व महिला दहशतवादी आसिया अंद्राबी हिनेही पाकिस्तानी झेंडे फडकावण्याच्या मसरत आलमच्या कृत्याचे समर्थन केले आहे. काश्मीर खोर्‍यात पाकिस्तानी झेंडे फडकावण्यात काहीही गैर नाही. गेल्या अनेक वर्षांपासून असे होत आले आहे. तुम्ही आम्हाला अटक करू शकता. परंतु, आमच्या भावनांना नाही, असे अंद्राबीने म्हटले आहे आणि यापुढेही पाकिस्तानी झेंडे फडकवतच राहू, अशी मुजोरी कायम ठेवली.
हाफिझ सईद, सलाउद्दीनकडून अभिनंदन
लष्कर-ए-तोयबा या पाकस्थित अतिरेकी संघटनेचा प्रमुख हाफिझ सईद आणि कुख्यात अतिरेकी सईद सलाउद्दीन यांनी श्रीनगर येथे बुधवारी झालेल्या रॅलीत भारतविरोधी आणि पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यासह पाकिस्तानी झेंडे फडकविणारा फुटीरवादी नेता मसरत आलम याचे दूरध्वनी करून अभिनंदन केले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22129

Posted by on Apr 16 2015. Filed under ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य (1776 of 2452 articles)


=माजी अंगरक्षकाचा दावा= नवी दिल्ली, [१६ एप्रिल] - आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे गूढ अद्याप उकलले ...

×