Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » म्हणे, सामूहिक योगाची गरजच काय?

म्हणे, सामूहिक योगाची गरजच काय?

=दिग्विजयसिंह पुन्हा बडबडले=
digvijay-singhनवी दिल्ली, [१० जून] – वाचाळ आणि वादग्रस्त बडबड करण्यासाठी प्रसिद्ध असलेले कॉंगे्रस सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी पुन्हा एकदा तोंड उघडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने येत्या २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्याची घोषणा केली असताना, योगाचे महत्त्वच माहीत नसलेल्या दिग्विजयसिंह यांनी मात्र सामूहिक योगाची गरजच काय, असा प्रश्‍न उपस्थित करून पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे.
सामूहिक योगाची गरजच काय. केंद्रातील मोदी सरकारची पहिल्या एक वर्षाचा कार्यकाळ पूर्णपणे अपयशी ठरली असल्याने, अपयश झाकण्यासाठी ते अशा प्रकारची नौटंकी करीत आहेत, अशी बडबडही त्यांनी केली.
विशेष म्हणजे, न्यूयॉर्क येथील आंतरराष्ट्रीय योगदिनाचे थेट प्रक्षेपण ऐतिहासिक मॅडिसन स्क्वेअरवर करण्यात येणार आहे. जगाच्या पाठीवरील अन्य देशांमध्येही २१ जूनला सामूहिक योग करण्यात येणार आहे. सर्वच धर्मांचे लोक यात सहभागी होत असताना, दिग्विजयसिंह यांनी मात्र आपल्या ट्विटरवरून टिवटिवाट सुरू केला आहे.
योगासन आरोग्यासाठी फारच उत्तम असते, पण त्याचे सामूहिक आयोजन कशाला हवे? मोदी सरकार आपले अपयश झाकण्यासाठीच हा प्रकार करीत आहे का, असा सवाल करताना योगाला धार्मिक आणि राजकीय मुद्यांशी जोडणे कितपत योग्य आहे, असेही ते म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22802

Posted by on Jun 11 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1639 of 2453 articles)


=शरद पवारांनी घेतले नितीशकुमारांसोबत जेवण= पाटणा, [१० जून] - समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांच्या मध्यस्थीमुळे कशीबशी मने जुळून आलेल्या ...

×