Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » यंदाच्या गाळप हंगामासाठी ऊस खरेदीकर माफ

यंदाच्या गाळप हंगामासाठी ऊस खरेदीकर माफ

=राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय=
sugar caneमुंबई, [२० जानेवारी] – राज्यातील २०१४-१५ च्या गाळप हंगामातील उसाचा खरेदीकर माफ करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाने शेतकर्‍यांना एफआरपीनुसार (रास्त किफायतशीर दर) ऊस दर देण्यास साखर कारखान्यांना मदत होणार आहे. तसेच खुल्या बाजारात साखरेचे कोसळलेले दर पहाता एफआरपी देण्यासाठी आवश्यक ती रक्कम उपलब्ध झाली पाहिजे, अशी मागणी सहकारी साखर कारखान्यांकडूनही करण्यात येत होती.
राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांना दिलेल्या उसाच्या किंमतीवर ऊस खरेदीकर आकारण्यात येतो. ही आकारणी महाराष्ट्र ऊस खरेदी कर अधिनियम-१९६२ मधील तरतुदीनुसार केली जाते. हा खरेदीकर २०१४-१५ च्या गाळप हंगामासाठी माफ करण्यात यावा, असा प्रस्ताव सहकार विभागाने सादर केला होता. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या एफआरपी एवढी रक्कम शेतकर्‍यांना देणे सहकारी साखर कारखान्यांना सुलभ व्हावे, यासाठी आर्थिक सवलत म्हणून हा खरेदीकर यंदाच्या गाळप हंगामासाठी माफ करण्यात यावा.
यासोबतच सहवीज निर्मिती प्रकल्प राबविणार्‍या ज्या साखर कारखान्यांना ऊस खरेदीकरमाफीची सवलत मिळाली आहे, त्यांना जास्तीचा एक वर्षासाठी ऊस खरेदीकर माफ करण्याचा प्रस्ताव होता, त्यालाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19851

Posted by on Jan 21 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (2199 of 2451 articles)


नवी दिल्ली, [२० जानेवारी] - भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी उद्या बुधवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीकरिता पूर्व दिल्लीतील कृष्णा नगर मतदारसंघातून ...

×