Home » ठळक बातम्या, प.महाराष्ट्र » यशवंत देव यांना राम कदम पुरस्कार

यशवंत देव यांना राम कदम पुरस्कार

yashwant devपुणे, [२३ जानेवारी] – शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान या संस्थेचा राम कदम कला गौरव पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ गीतकार आणि संगीतकार यशवंत देव यांना जाहीर झाला आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे १९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता पुरस्काराचे वितरण होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
मराठी संगीताला सातासमुद्रापार नेण्याची किमया देव यांनी केली आहे. तसेच त्यांचा आकाशवाणीवरील भावसरगम हा कार्यक्रमही गाजला होता. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असल्याचे खाबिया यांनी सांगितले. पुरस्काराचे हे दहावे वर्ष असून संगीत क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणार्‍या व्यक्तींना तो देण्यात येतो. गीतकार जगदीश खेबुडकर, संगीतकार भास्कर चंदावरकर, गीतकार अजय-अतुल, अशोक पत्की, सुरेश वाडकर, उषा मंगेशकर यांना यापूर्वी हा पुरस्कार देण्यात आला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19990

Posted by on Jan 24 2015. Filed under ठळक बातम्या, प.महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, प.महाराष्ट्र (2186 of 2451 articles)


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाचा थाटात शुभारंभ पानिपत, [२२ जानेवारी] - कन्या भ्रूणहत्या ही ...

×