Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » याकुबच्या फाशीच्या आक्षेपार्ह वृत्तसंकलनावर कारवाईचा इशारा

याकुबच्या फाशीच्या आक्षेपार्ह वृत्तसंकलनावर कारवाईचा इशारा

=सूचना व प्रसारण मंत्रालयाची तीन वाहिन्यांना नोटीस=
Ministry of Information & Broadcasting logoनवी दिल्ली, [८ ऑगस्ट] – १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील एक सूत्रधार याकुब मेमनच्या फाशीच्या वृत्तसंकलनावर तीव्र नाराजी व्यक्त करून सूचना व प्रसारण मंत्रालयाने तीन आघाडीच्या वृत्तवाहिन्यांना कारणेदाखवा नोटीस बजावली असून, कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणाही केली.
एका वृत्तवाहिनीच्या मते, मंत्रालयाने आजतक, एबीपी न्यूज आणि एनडीटीव्ही या तीन वाहिन्यांना नोटीस जारी केली आहे. तथापि, याबाबत याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. या वाहिन्यांनी याकुबच्या फाशीविषयी वृत्तसंकलन करताना याबाबत असलेल्या नियमांचे उल्लंघन केले. या आधारे कारवाई का केली जाऊ नये, अशी विचारणा यात करण्यात आली असल्याचे सूत्राने सांगितले.
अशा घटनांचे वृत्तसंकलन करताना अर्धसत्य, प्रक्षोभक, चुकीच्या आणि दिशाभूल करणार्‍या बातम्या प्रसारित केल्या जाऊ नये. शिवाय, हिंसाचाराला प्रोत्साहन मिळेल किंवा कायदा व सुव्यवस्थेची समस्या निर्माण होईल, अशा बातम्याही दाखविल्या जाऊ नये, अशी स्पष्ट तरतूद या कायद्यातील विविध कलमांमध्ये आहे. असे असतानाही या तीन वाहिन्यांनी याकुबच्या फाशीचे वृत्तसंकलन करताना नियमांचे पालन केले नाही. यातील दोन वाहिन्यांनी तर फाशीच्या दिवशी अंडरवर्ल्डचा डॉन छोटा शकील आणि एका वाहिनीने याकुबच्या वकिलाची मुलाखत प्रसारित केली.
या वाहिन्यांकडून उत्तर सादर झाल्यानंतर सूचना व प्रसारण मंत्रालयातील अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती त्याचा अभ्यास करेल आणि समाधान न झाल्यास या वाहिन्यांविरुद्ध कारवाईची रूपरेषा निश्‍चित करेल, असे सूत्राने सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23604

Posted by on Aug 9 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1525 of 2453 articles)


=‘मेक इन इंडिया’ला महाराष्ट्रात गती, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी= मुंबई, [८ ऑगस्ट] - इलेक्ट्रॉनिक्स वस्तू निर्मितीच्या क्षेत्रात जगात आघाडीवर असलेल्या ...

×