Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » याकुबच्या याचिकेवर आज अंतिम निर्णय

याकुबच्या याचिकेवर आज अंतिम निर्णय

yakub memonनवी दिल्ली, [२७ जुलै] – फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीबाबत विशेष टाडा न्यायालयाने जारी केलेल्या आदेशाला आव्हान देणार्‍या १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील दोषी याकुब मेमनच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय उद्या मंगळवारी अंतिम निर्णय देणार आहे.
याकुबच्या याचिकेवर आज सोमवारी झालेली सुनावणी अपूर्ण राहिली. सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांनी त्यासाठी विशेष न्यायासनही गठित केले आहे. तथापि, या विशेष न्यायासनाने आज कोणताही निर्णय घेतला नाही. आपण उद्या मंगळवारी अंतिम निर्णय घेणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. दरम्यान, याकुबची फाशी रद्द करण्यात यावी, यासाठी काही राजकीय पक्षांच्या नेत्यांसह माजी न्यायमूर्ती आणि प्रख्यात विधिज्ञांनीही राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे याचिका सादर केली आहे. या पार्श्‍वभूमीवर न्यायालय उद्या काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
टाडा न्यायालयाने याकुबच्या फाशीची औपचारिकता पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतर नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात फाशीची तयारीही पूर्ण करण्यात आली असतानाच, त्याने आपल्या वकिलाच्या माध्यमातून पुन्हा एकदा दयेचा अर्ज राज्यपालांकडे आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून टाडा न्यायालयाच्या आदेशालाही आव्हान दिले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23512

Posted by on Jul 28 2015. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1546 of 2453 articles)


=मराठवाड्यात मुख्यमंत्र्यांचा मदतीचा हात= लातूर : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निधीची कमतरता जाणवणार नाही, वेळप्रसंगी कर्ज काढण्याचीही राज्य शासनाची तयारी आहे, अशी ...

×