Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » यावर्षी ‘रेनडान्स’वर बंदी

यावर्षी ‘रेनडान्स’वर बंदी

=होळीवरही दुष्काळाचे सावट, कोरडी होळी साजरी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन=

epa02650519 Revellers dance as they are splashed with colored water during a procession  on the occasion of the Rangapanchami festival in Bhopal, Madhay Pradesh, India, 24 March 2011. The festival is being celebrated on fifth day after the Holi festival.  EPA/SANJEEV GUPTA

मुंबई, [१६ मार्च] – गेल्या दोन वर्षांपासून मान्सूनचा पाऊस अतिशय कमी पडल्याने राज्याच्या विविध भागात दुष्काळ पडला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील स्थिती तर विदारक अशीच आहे. मनुष्य आणि जनावरांची पाण्यासाठी पायपीट सुरू असल्याने अवघ्या आठवडाभरावर असलेल्या होळीच्या सणात नागरिकांनी ‘रेनडान्स’ करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बुधवारी केले.
होळीत दरवर्षीच ‘रेनडान्स’ करण्यात येत असतो आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. पण, यावर्षी राज्यात भीषण पाणी टंचाई असल्याने रेनडान्ससाठी पाणी देण्यात येऊ नये, तसेच स्विमिंग पुलांचाही पाण्याचा पुरवठा तात्पुरता बंद करण्यात यावा, असा आदेश राज्य सरकारने सर्व महानगर पालिकांना दिले आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यातील सर्व स्विमिंग पूल बंद ठेवण्याचे आणि त्यांना होणारा पाणीपुरवठाही जुलैपर्यंत थांबविण्याचे निर्देश दिले आहेत.
पाण्यासाठी नागरिक व जनावरांची पायपीट सुरू असल्याने नागरिकांनी यंदा कोरडी होळी खेळावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले असल्याचे त्यांच्या कार्यालयातून जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
विशेष म्हणजे, येत्या २२ मार्च रोजी जागतिक जलदिन साजरा करण्यात येणार आहे. याच अनुषंगाने राज्य सरकारने १६ ते २२ मार्च या काळात जलजागृती सप्ताह पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमाचा प्रारंभ आज बुधवारी मंत्रालयाच्या प्रांगणात झाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना पाण्याचा सावध वापर करण्याचे आवाहन केले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27378

Posted by on Mar 17 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (637 of 2451 articles)


=नजमा हेपतुल्ला यांची राष्ट्रवादी भूमिका= नवी दिल्ली, [१६ मार्च] - मानेवर सुरा ठेवला तरी ‘भारत माता की जय’ म्हणणार नाही, ...

×