Home » ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य » यासिन मलिकला अटक

यासिन मलिकला अटक

=काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाला नकार, म्हणे, राज्यात हिंसाचार वाढेल=
yasin-malik_agniveshश्रीनगर, [१८ एप्रिल] – जम्मू-काश्मिरात दहशतवादाचा उद्रेक झाल्यानंतर स्थलांतरित झालेल्या काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी केंद्र सरकारने पाऊल उचलल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनाला विरोध करून ३० तासांच्या उपोषणावर बसलेला जेकेएलएफचा म्होरक्या यासिन मलिकला पोलिसांनी आज शनिवारी अटक केली.
काश्मिरी पंडितांकरिता खोर्‍यातच नवी वसाहत निर्माण करण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करण्याचा निर्णय राज्यातील भाजपा-पीडीपी सरकारने घेतला होता. या निर्णयाच्या निषेधार्थ मलिकने उपोषण पुकारले होते. काश्मिरी पंडितांकरिता वेगळी वसाहत बांधण्यास आमचा विरोध आहे. त्यांनी अन्य समुदायासोबतच राहावे. कारण, काश्मिरी पंडितांना वसाहत बांधून दिल्यास राज्यात हिंसाचार उफाळून येईल, असा दावा त्याने उपोषणस्थळी पत्रकारांशी बोलताना केला.
दरम्यान, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे माजी समर्थक स्वामी अग्निवेशही मलिकसोबत उपोषणाला बसले होते. त्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22177

Posted by on Apr 18 2015. Filed under ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य (1768 of 2452 articles)


नवी दिल्ली, [१८ एप्रिल] - आपल्या ‘मेक इन इंडिया’ अभियानात जागतिक सहभाग सुनिश्‍चित करण्याच्या उद्देशाने फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडा या ...

×