Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » ‘याहू’चे काही प्रॉडक्ट्‌स बंद

‘याहू’चे काही प्रॉडक्ट्‌स बंद

yahoo-logoनवी दिल्ली, [१४ मार्च] – गेल्या काही वर्षांपासून सर्च इंजिन याहूने आपला विस्तार कमी करण्यास सुरुवात केली आहे. आता कंपनीने याहू गेम्स, लाईव्ह टेक्स्ट आणि ऍस्ट्रॉलॉजी हे लोकप्रिय प्रोडक्ट्‌स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
टंबलर या कंपनीच्या सोशल मीडिया नेटवर्कवर यासंबंधी पोस्ट करण्यात आली आहे. ‘आम्ही आमचा उद्योग साधारण बनविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत कंपनी इतर कंझ्युमर प्रोडक्ट्‌सवर लक्ष केंद्रीत करणार आहे. याहू मेल, सर्च, टंबलर, न्यूज, लाईफस्टाईल आणि स्पोटर्‌‌सवर जास्त लक्ष दिले जाणार आहे,’ अशी माहिती संबंधित पोस्टमध्ये देण्यात आली आहे.
याहू गेम्सची वेबसाईट आणि पब्लिशिंग चॅनल १३ मेपासून बंद करण्यात येणार आहे. व्हिडिओ चॅटींग सर्व्हिस लाईव्ह टेक्स्ट मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर, साधारण एप्रिल महिन्यात भारतासह इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनमधील ऍस्ट्रॉलॉजी सेवाही बंद करण्यात येणार आहे. खास सौदी राष्ट्रांसाठी चालविण्यात येणार्‍या न्यूज, सेलिब्रिटी, फिल्म, स्टाईल, हेल्थ यासारख्या सेवा बंद करण्यात येणार असून, त्याऐवजी कंपनी ‘याहू मकतूब’ नावाचे होमपेज सुरू करणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27292

Posted by on Mar 14 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (672 of 2458 articles)


•स्वयंसेवकांना हाफ पॅण्टऐवजी फुल पॅन्ट • खाकी रंगाची जागा तपकिरी घेणार नागौर (राजस्थान), [१३ मार्च] - ९१ वर्षांची परंपरा ...

×