Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » युएईमध्ये दाऊदच्या संपत्तीवर टाच

युएईमध्ये दाऊदच्या संपत्तीवर टाच

dawood ibrahimनवी दिल्ली, [७ सप्टेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे अंडरवर्ल्डचा पळपुटा म्होरक्या आणि मार्च १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट मालिकेतील मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिम आता चांगलाच अडचणीत आला आहे. संयुक्त अरब अमिरातने (युएई) त्याच्या संपत्तीवर टाच आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच संयुक्त अरब अमिरातचा दौरा केला होता. या दौर्‍यामुळे भारत आणि अमिरातचे संबंध अतिशय मजबूत झाले आहेत. या दौर्‍याच्या काळात मोदी यांनी अमिरातचे नरेश आणि अन्य नेत्यांना दाऊदची आर्थिक कोंडी करण्याचे आवाहन करतानाच अमिरातमध्ये दाऊदची संपत्ती कोणकोणत्या ठिकाणी आहे, याचा तपशीलही सादर केला होता. पंतप्रधानांच्या आवाहनाला मान देत अमिरात प्रशासनाने अलीकडेच भारत सरकारला एक यादी सोपविली आहे. यात दाऊदच्या कोणकोणत्या संपत्तीवर टाच आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, याविषयीची सविस्तर माहिती आहे.
दाऊद सध्या पाकिस्तानच्याच आश्रयात आहे. पण, पाक सरकार मात्र तो आपल्या देशात नसल्याचा दावा वारंवार करीत आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी अलीकडेच त्याचे काही फोट टॅप केले होते. यावरून दाऊद कराचीतच असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमिरातमध्ये त्याच्या बेकायदेशीर व्यवसायाचा मोठा व्याप आहे. पण, अमिरातने त्याची आर्थिक नाकेबंदी सुरू केली असल्याने त्याला, तसेच त्याच्या ‘डी’ कंपनीला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23732

Posted by on Sep 9 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1502 of 2458 articles)


पाटणा, [७ सप्टेंबर] - जागावाटपाच्या मुद्यावर नाराज होऊन जनता परिवारातून बाहेर पडलेल्या समाजवादी पार्टीने बिहार विधानसभेच्या सर्व २४३ जागा लढविण्याचा ...

×