Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » युद्धासाठी सज्ज राहा!

युद्धासाठी सज्ज राहा!

=किम जोंग यांचे लष्कराला निर्देश=
korean-warसेऊल, [२१ ऑगस्ट] – उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यातील सीमेवर वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग यांनी आपल्या लष्कराला युद्धासाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले असून, यामुळे तणावात आणखी भर पडली आहे.
दुसरीकडे माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार उपग्रहाच्या माध्यमातून समोर आलेल्या काही छायाचित्रांमध्ये किम जोंग यांनी राजधानी प्योंगयांग येथील आपल्या सर्व राजमहालांसमोर धावपट्टी तयार केली आहे. या धावपट्ट्यांवरून लढाऊ विमाने सहजपणे ये-जा करू शकतात. केसीएनए या उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार जोंग यांनी गुरुवारी लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेतली. सीमेवर तैनात असलेल्या तुकड्यांनी उत्तर कोरियाच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी पाचपासून युद्धासाठी सज्ज राहावे, असे निर्देश या बैठकीनंतर देण्यात आले आहेत.
गेल्या शनिवारपासून दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. सीमेवर लावण्यात आलेले लाऊडस्पीकर्स ४८ तासांच्या आत काढून घ्या, असा इशारा उत्तर कोरियाने हॉटलाईनवरून दक्षिण कोरियाला दिला होता. मात्र, दक्षिण कोरियाने असे करण्यास नकार दिला. त्यामुळे नाराज उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र हल्ला केला. प्रत्युत्तरात दक्षिण कोरियानेही गुरुवारी तोफांनी मारा केला. उत्तर कोरियाची ही आक्रमक भूमिका लक्षात घेता, दक्षिण कोरियाच्या सैन्यानेही सर्वोच्च स्तराचा अलर्ट जारी केला आहे. याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक बोलावून परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23635

Posted by on Aug 22 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1525 of 2458 articles)


मुंबई, [२० ऑगस्ट] - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान केला आहे. महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येणारा हा सर्वोच्च ...

×