Home » आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप » युनोमुळे जग एकत्र आले

युनोमुळे जग एकत्र आले

=युनेस्कोत नरेंद्र मोदींचे प्रतिपादन=
Prime Minister Narendra Modi delivering his address at UNESCO in Parisपॅरिस, [१० एप्रिल] – संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रयत्नांमुळेच संपूर्ण जग एकत्र आले आहे आणि भविष्यातही असेच एकत्र राहणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी येथे केले.
संयुक्त राष्ट्राची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था असलेल्या युनेस्कोला संबोधित करताना पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी राजनयिक अधिकारी, खाजगी क्षेत्रातील प्रतिनिधी, युनेस्कोचे सदस्य आणि मोठ्या संख्येत मान्यवर उपस्थित होते. युनेस्कोशिवाय जगातील कोणतीही संघटना मानव समाजाचे इतक्या उत्तमरीत्या हित साधू शकत नाही, असे मोदी यांनी आवर्जुन सांगितले.
युनेस्कोला संबोधित करणे हा माझा खरोखरच फार मोठा सन्मान आहे, असे सांगताना मोदी म्हणाले की, ७० व्या वर्धापनदिन सोहळ्यात या महान संस्थेला भेट देण्याची संधी मला मिळाली, हे मी आपले भाग्यच समजतो. संयुक्त राष्ट्रसंघ ही संपूर्ण जगाचीच संघटना आहे. गेल्या काही दशकांमध्ये अनेक बदल झाले, अनेक आव्हाने समोर आलीत. त्यावर मात करून जगाने नेत्रदीपक असा विकासही साधला. हे सर्व संयुक्त राष्ट्रामुळेच शक्य झाले.
संयुक्त राष्ट्रसंघाचा तातडीने विस्तार करण्याच्या आवश्यकतेवर भर देताना मोदी म्हणाले की, युनोच्या छत्रछायेत जग एकत्र आले आहे आणि माझा असा विश्‍वास आहे की, हे जग जर आज सर्वात सुंदर आणि सुरक्षित ठिकाण झाले आहे ते केवळ युनोमुळेच. कारण, मानवापुढे उभ्या ठाकणार्‍या अनेक आव्हानांना युनोने योग्यपणे हाताळले आहे. या जगाकरिता शांत आणि समृद्ध भविष्य घडविणे, हेच आता आपले एकमेव सामूहिक उद्दिष्ट असायला हवे. या शांत आणि समृद्ध जगात प्रत्येक राष्ट्राला स्वत:चा आवाज असायला हवा, प्रत्येक नागरिकाची स्वत:ची ओळख असावी, या बगिच्यात प्रत्येक संस्कृतीचे फूल उमलायला हवे, प्रत्येक मनुष्याला प्रतिष्ठा मिळावी, प्रत्येक बालकाचे भवितव्य सुरक्षित असावे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21947

Posted by on Apr 11 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप (1813 of 2458 articles)


मुद्रा बँकेचे उद्‌घाटन गारपीटग्रस्तांना पंतप्रधानांचा मदतीचा हात ३३ टक्के नुकसान झालेल्यांनाही मिळणार मदत = नवी दिल्ली, [८ एप्रिल] - ...

×