Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » युपीएससीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

युपीएससीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

=उमेदवारांसाठी खुशखबर…=
UPSCनवी दिल्ली, [२४ मे] – केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थातच युपीएससीची परीक्षा देण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे… या परीक्षेसाठी आता ऑनलाईन अर्ज भरण्याचीही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर यावेळी उमेदवार लोकसेवा किंवा भारतीय वनसेवा अशा दोन पर्यायांचीही निवड करू शकणार आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोगानेच याबाबतची माहिती दिली आहे. ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा देण्याची प्रक्रिया आयोगाने पूर्ण केली आहे. ऑनलाईन सुविधा २३ मेपासून सुरू झाली असून, ती १९ जूनपर्यंत चालणार आहे. उमेदवारांना प्रवेश पत्रही युपीएससीच्या सांकेतिक स्थळावरच प्राप्त होणार आहे. त्यामुळे अर्ज भरल्यानंतर टपाल खात्याकडून प्रवेश पत्र मिळण्याच्या त्रासापासून उमेदवारांची मुक्तता होणार आहे.
राष्ट्रीय स्तरावर होणार्‍या लोकसेवा परीक्षेचे आयोजन युपीएससीकडून तीन टप्प्यात केले जाते. यात प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीन टप्प्यांचा समावेश आहे. या परीक्षेच्या माध्यमातून भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलिस सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा आणि अन्य महत्त्वाच्या सेवांकरिता अधिकार्‍यांची निवड केली जाते. यावर्षी प्राथमिक परीक्षा २३ ऑगस्ट रोजी देशभरातील ७१ ठिकाणी तीन हजार केंद्रांवर घेण्यात येणार आहे. ऑनलाईन सुविधा उपलब्ध झाल्याने उमेदवारांना याच सुविधेचा वापर अनिवार्य राहणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22678

Posted by on May 25 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1664 of 2453 articles)


=कॉंगे्रसची धोरणेच जबाबदार : नजमा हेपतुल्ला= नवी दिल्ली, [२४ मे] - केंद्रात भाजपा सरकार आहे म्हणून देशातील मुस्लिमांच्या मनात दुरावल्याची ...

×