Home » आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप » युरोपियन समूहातून ब्रिटनची ‘एक्झिट’

युरोपियन समूहातून ब्रिटनची ‘एक्झिट’

  • ५२ टक्क्यांचे जनमत
  • डेव्हिड कॅमरून यांची राजीनाम्याची घोषणा
  • तीन महिन्यानंतर नवा पंतप्रधान
  • जगभरात खळबळ

The EU and the Union flags fly outside The European Commission Representation in the United Kingdom in London...The EU and the Union flags fly outside The European Commission Representation in the United Kingdom in central London January 23, 2013. Britain's Prime Minister David Cameron promised on Wednesday to give Britons a referendum choice on whether to stay in the European Union or leave if he wins an election in 2015, placing a question mark over Britain's membership for years. REUTERS/Stefan Wermuth (BRITAIN - Tags: POLITICS TPX IMAGES OF THE DAY)लंडन, [२४ जून] – २८ सदस्यीय युरोपियन समूहातून बाहेर पडायचे की नाही, या मुद्यावर ब्रिटनमध्ये गुरुवारी घेण्यात आलेल्या सार्वमताचा निकाल आज शुक्रवारी समोर आला आहे. युरोपियन समूहातून बाहेर पडण्याच्या बाजून सुमारे ५२ टक्के नागरिकांनी मतदान केले आहे. यामुळे ब्रिटनची या शक्तिशाली समूहातून ‘एक्झिट’ झाली आहे. संपूर्ण जगाला हादरविणार्‍या या घडामोडीनंतर पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी राजीनाम्याची घोषणा केली. दरम्यान, या घडामोडीचा धक्कादायक परिणाम भारत आणि आशियासोबतच जगभरातील बाजारपेठांमध्येही पाहायला मिळाला आहे.
ब्रिटनने युरोपियन समूहात राहू नये, यावर ५१.९० टक्के नागरिकांनी मतदानाच्या माध्यमातून आपले मत नोंदविले. हे काठावरचेच बहुमत असले, तरी या निर्णयामुळे ब्रिटन आता नेहमीकरिता या समूहातून बाहेर पडला आहे. युरोपियन समुहात राहायचे की नाही, हा मुद्दा ब्रिटनमध्ये चांगलाच पेटला होता. यात लेबर पार्टीच्या खासदार जोआना कॉक्स यांना आपला जीव गमवावा लागला. या सार्वमतात ४ कोटी ६५ लाख १ हजार २४१ म्हणजेच देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ७१.९ टक्के नागरिकांनी सहभाग घेतला होता. यातील ४८.१ टक्के नागरिकांनी युरोपियन समूहातच राहण्याच्या बाजूने मतदान केले होते. या चाचणीत २६ हजार ३३ मते बाद ठरविण्यात आली.
असे आहे युरोपियन समूह
युरोपियन समुहात एकूण २८ देशांचा समावेश असून त्यांची एकत्रित लोकसंख्या ५० कोटींच्या घरात आहे. या समूहाची अर्थव्यवस्था १६ खर्व डॉलर्सची असून, तिचा जागतिक दरडोई उत्पन्नातील वाटा एक चतुर्थांश इतका आहे. या समूहातील नागरिक सदस्य देशांमध्ये व्हिसाशिवाय मुक्तपणे प्रवास, व्यापार, नोकरी करू शकतात. या सर्व २८ देशांमध्ये युरो हे एकच चलन वापरले जाते. १९७३ मध्ये ब्रिटनने या समूहाचे सदस्यत्व स्वीकारले होते. तथापि, बदललेल्या आर्थिक परिस्थितीत, विशेषत: निर्वासितांचे लोंढे वाढल्यामुळे युरोपियन समूहातून बाहेर पडण्याची मागणी ब्रिटनमध्ये जोर धरू लागली. त्यावर निर्णय घेता यावा म्हणून हे सार्वमत घेण्यात आले होते.
ऑक्टोबरमध्ये नवा पंतप्रधान
सार्वमताचा निर्णय आज सकाळी जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी नागरिकांच्या भावनांचा सन्मान करीत राजीनामा देण्याची घोषणा केली. येत्या ऑक्टोबरमध्ये पंतप्रधानपदासाठी निवडणूक होईल आणि युरोपियन समूहातून बाहेर पडण्याची प्रक्रिया नव्या पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालीच पार पडेल, असे त्यांनी जाहीर केले. विशेष म्हणजे, युरोपियन समूहातून ब्रिटनने बाहेर पडण्यास कॅमरून यांचा विरोध होता.
आपल्या १० डाऊनिंग स्ट्रीट येथील निवासस्थानी राजीनाम्याची घोषणा करताना कॅमरून यांनी जगाला विशेषत: युरोपियन समूहाला आश्‍वस्त केले की, हे बदल तातडीने लागू होणार नाहीत. आतापर्यंत ब्रिटनचे नागरिक युरोपियन समूहातील देशांमध्ये जसे मुक्तपणे प्रवास व व्यापार करीत होते, ती प्रथा कायम राहील. या काळात अन्य सदस्य देशांच्या वस्तूदेखील ब्रिटनमध्ये विकल्या जातील. समूहातून बाहेर पडण्याची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी देशाला नव्या नेतृत्वाची गरज आहे आणि ते लवकरच मिळणार आहे. येत्या सोमवारी माझ्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि त्यात माझ्या राजीनाम्याची रूपरेषा निश्‍चित होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28779

Posted by on Jun 25 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप (185 of 2458 articles)


सेऊल, [२४ जून] - अथक प्रयत्न केल्यानंतरही चीनच्या प्रखर विरोधामुळे भारताला ४८ सदस्यांच्या अणुपुरवठादार देशांच्या गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळविण्यात अखेर ...

×