युवापिढीला संधी देण्यासाठी चंदर यांची उचलबांगडी : पर्रिकर
Thursday, January 15th, 2015नवी दिल्ली, [१४ जानेवारी] – संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) प्रमुख अविनाश चंदर यांना बडतर्फ करण्यात वादाचा कोणताही विषय नसून, युवापिढीला संधी देण्यासाठी आपण स्वत: अशी शिफारस केली होती, असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी स्पष्ट केले आहे.
अविनाश चंदर यांचा कार्यकाळ गेल्यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यातच संपुष्टात आला होता आणि आधीच्या सरकारने कंत्राटी पद्धतीने त्यांचा कार्यकाळ वाढविला होता. अशा वरिष्ठ पदांवरील नियुक्ती ही कंत्राटी पद्धतीने होता कामा नये. या पदावर नियुक्तीसाठी अनेक जण पात्र आहेत आणि त्यापैकी एकाची या पदावर नियुक्ती झाली पाहिजे, असे मनोहर पर्रिकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आणि यामध्ये वाद निर्माण करण्यासारखे काहीही नसल्याचे स्पष्ट केले.
कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेली व्यक्ती या पदावर नसावी, अशी शिफारस मी स्वत: केली होती. आता विज्ञान जगात आम्ही युवापिढीला संधी दिली पाहिजे, असे पर्रिकर यांनी नॉर्थ ब्लॉकबाहेर बोलताना सांगितले. या पदावर कुणाची नियुक्ती होईल, असे विचारले असता सध्या संस्थेत वरिष्ठ असलेल्या व्यक्तीची या पदावर अस्थायी नियुक्ती केली जाईल. आम्ही डीआरडीओमध्येच विकासाची दूरदृष्टी असलेली एखादी व्यक्ती शोधून त्याची नियुक्ती करू, असेही पर्रिकर यांनी सांगितले.
Short URL: https://vrittabharati.in/?p=19716

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!